आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत स्टुअर्ट ब्रॉडची मुसंडी

टीम ई-सकाळ
Wednesday, 29 July 2020

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेत विक्रम रचला.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेत विक्रम रचला. त्यामुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने दहाव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या नंबरवर उडी घेतली आहे. 

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीमध्ये दमदार कामगिरी केली.   त्याने सामन्याच्या पहिल्या डावात 62 धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावले. तर पहिल्याच डावात धारदार गोलंदाजी करत 6 विकेट आणि दुसऱ्या डावात 4 विकेट मिळवल्या. याशिवाय या मालिकेतील पहिल्या सामन्यात ब्रॉडला वगळल्यानंतर, इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीत ब्रॉडला मैदानावर उतरवले होते. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने 6 बळी टिपले होते. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. स्टुअर्ट ब्रॉडच्या या कामगिरीमुळे आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत देखील मोठी सुधारणा झाली असून, स्टुअर्ट ब्रॉडने तिसरे स्थान पटकावले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

गोलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत स्टुअर्ट ब्रॉडच्या नावावर 823 अंक जमा झाले आहेत. तर वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर 810 अंकांसह पाचव्या स्थानावर घसरला आहे. तसेच भारतीय संघाचा गोलंदाज जसप्रीत बुमराह सातव्या क्रमांकावरून आठव्या स्थानी आला आहे. जसप्रीत बुमराहचे 779 अंक आहेत.      

दरम्यान, इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजने 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावांपासून पुढे फलंदाजीस करण्यास सुरवात केली. मात्र सामना चालू होताच पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवावा लागला होता. व पाऊस थांबल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला 19 धावांवर पायचीत करत, इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले होते. या विकेटमुळे ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी टिपले आणि इतिहास रचला. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड हा असा पराक्रम करणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला. 

 


​ ​

संबंधित बातम्या