स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

टीम ई-सकाळ
Tuesday, 28 July 2020

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेत विक्रम रचला आहे. 

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळला जात आहे. या कसोटीच्या पाचव्या आणि अखेरच्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेत विक्रम रचला आहे. 

ENGvsWI 3rd Test : पावसाच्या खेळीमुळे तिसऱ्या व निर्णायक कसोटीत इंग्लंडला संघर्ष करावा लागणार

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस पावसामुळे वाया गेला. त्यानंतर आज वेस्ट इंडिजने 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावांपासून पुढे फलंदाजीस करण्यास सुरवात केली. मात्र सामना चालू होताच पुन्हा पावसाचे आगमन झाल्यामुळे खेळ काही वेळासाठी थांबवावा लागला. व पाऊस थांबल्यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वेस्ट इंडिजचा सलामीवीर क्रेग ब्रेथवेटला 19 धावांवर पायचीत करत, इंग्लंडला तिसरे यश मिळवून दिले. या विकेटमुळे ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळी टिपले आणि इतिहास रचला. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड हा असा पराक्रम करणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला आहे. आत्तापर्यंत फक्त 6 गोलंदाजांनीच कसोटी कारकिर्दीमध्ये 500 हुन अधिक विकेट मिळवल्या आहेत. श्रीलंकेच्या मुथिय्या मुरलीधरनने 800, ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नने 708, भारताच्या अनिल कुंबळेने 619, इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने 589, ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राने 563 व  वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉल्सने 519 बळी घेतले आहेत. त्यानंतर आता स्टुअर्ट ब्रॉडचा देखील या यादीत समावेश झाला आहे.       

तसेच स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीमध्ये या सामन्यात दमदार कामगिरी केली असून, पहिल्या डावात त्याने 62 धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावले. तर पहिल्याच डावात धारदार गोलंदाजी करत 6 विकेट आणि दुसऱ्या डावात आत्तापर्यंत 3 विकेट मिळवल्या आहेत. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात

दरम्यान, इंग्लंडने दिलेल्या 389 धावांचा पाठलाग करताना, वेस्ट इंडीज संघाने 5 फलंदाज गमावत 84 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. मात्र परत पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला असून, सामना इंग्लंडच्या बाजूने झुकला असताना पावसाने वेस्ट इंडीज संघाला दिलासा आहे.    


​ ​

संबंधित बातम्या