होय! पहिल्या सामन्यातून वगळल्याने केला होता 100 टक्के निवृत्तीचा विचार

टीम ई-सकाळ
Sunday, 2 August 2020

पहिल्याच सामन्यात प्लेयिंग इलेव्हन मधून बाहेर ठेवल्यामुळे निवृत्ती स्वीयकारण्याचा विचार देखील डोक्यात आल्याचा खुलासा स्टुअर्ट ब्रॉडने केला.

इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने आत्तापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीमध्ये दमदार कामगिरी केली. स्टुअर्ट ब्रॉडने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 500 वी विकेट घेत या सामन्यात विक्रम रचला होता. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉड हा असा पराक्रम करणारा जगातील सातवा गोलंदाज ठरला. मात्र या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला  वगळण्यात आले होते. त्यानंतर आता त्यावेळेस सामन्यातून वगळण्यात आल्यामुळे क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार मनात आल्याचे स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले आहे.     

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

कोरोनाच्या संकटातून सावरत इंग्लंड-विंडीज कसोटी मालिकेने मागील महिन्याच्या 8 जुलै पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली होती. त्यानंतर साउथहॅम्प्टनच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला वगळत, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड यांना खेळवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे संघाच्या या निर्णयानंतर निराश झाल्याचे स्टुअर्ट ब्रॉडने एका मुलाखतीत सांगितले आहे. एवढेच नाहीतर, पहिल्याच सामन्यात प्लेयिंग इलेव्हन मधून बाहेर ठेवल्यामुळे निवृत्ती स्वीकारण्याचा विचार देखील डोक्यात आल्याचा खुलासा स्टुअर्ट ब्रॉडने केला.

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 
 

यापूर्वी देखील संघातून ड्रॉप केल्यानंतर कधीही निवृत्त होण्याचा विचार मनात आला नसल्याचे स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले. मात्र यावेळेस पहिल्या सामन्यात कर्णधार असलेल्या बेन स्टोक्सने, मी खेळत नसल्याचे सांगितल्याने आपण हादरल्याचे  स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला. व संघाच्या निर्णयावर बोलू शकत नसल्यामुळे, शंभर टक्के निवृत्ती स्वीकारण्याचा विचार मनात डोकावल्याचे स्टुअर्ट ब्रॉडने सांगितले. याशिवाय जैव-सुरक्षित वातावरणात सामना होत असल्यामुळे आणि संघाने पहिल्याच सामन्यात न खेळवण्याच्या निर्णयाने निराशेत अधिक भर पडल्याचे ब्रॉडने म्हटले. 

2007-08 मधील ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून परतलो असतो, मात्र...  

इंग्लंड आणि विंडीज यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना साउथहॅम्प्टन येथे खेळवण्यात आला होता. या सामन्यात विंडीज संघाने चांगली कामगिरी करत, यजमान इंग्लंड संघाला पराभूत केले होते. यानंतर इंग्लंड संघाने दुसऱ्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडला मैदानावर उतरवले होते. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने 6 बळी टिपले होते. तर तिसऱ्या व शेवटच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या डावात 62 धावांची खेळी करत वेगवान अर्धशतक झळकावले होते. व पहिल्याच डावात धारदार गोलंदाजी करत 6 विकेट आणि दुसऱ्या डावात 4 विकेट मिळवल्या होत्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या या खेळीमुळे इंग्लंडने ही मालिका 2 - 1 ने आपल्या खिशात घातली होती. त्यामुळे स्टुअर्ट ब्रॉडला सामनावीर आणि मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला होता. तसेच आयसीसीच्या कसोटी क्रमवारीमध्ये स्टुअर्ट ब्रॉडने दहाव्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या नंबरवर उडी घेतली.         
             


​ ​

संबंधित बातम्या