गोष्ट महाराष्ट्र केसरीच्या चांदीच्या गदेची...!

संपत मोरे
Wednesday, 19 December 2018

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडून १९८२ सालापासून त्यांच्या स्मृतीनिमित्ताने महाराष्ट्र केसरीची गदा विजेत्या पैलवानाना दिली जाते.

पुणे- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक मामासाहेब मोहोळ यांच्या कुटुंबियांकडून १९८२ सालापासून त्यांच्या स्मृतीनिमित्ताने महाराष्ट्र केसरीची गदा विजेत्या पैलवानाना दिली जाते. यावर्षीच्या गदेचे पूजन माजी खासदार अशोकराव मोहोळ,कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे ,संग्राम मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने १९६१ सालापासून विजेत्या पैलवानास चांदीची गदा दिली जात होती,१९८२ सालापासून मोहोळ कुटुंबीय ही गदा देते. गेली ३४ वर्षे या कुटुंबियांकडून ही गदा दिली जाते. यावर्षी जालना येथे होणाऱ्या कुस्ती अधिवेशनासाठीच्या गदेचे पूजन करण्यात आले. मामासाहेब मोहोळ यांनी राज्यातील कुस्तीगीरांना एकत्र आणले. त्यांचा कुस्तीप्रेमाचा  वारसा त्यांचे कुटुंबीय जपत आहेत.

या गदेवर मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा आणि हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसवलेले असते. साधारण दहा ते बारा किलोची ही गदा असते. उंची  27 ते 30 इंच तर व्यास
 9 ते 10 इंच असतो.


​ ​

संबंधित बातम्या