AUSvsNZ : तो डेड बॉल नव्हताच, म्हणत स्मिथ गेला पंचांच्या अंगावर धाऊन 

वृत्तसंस्था
Thursday, 26 December 2019

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मैदानावरील पंच निगेल लॉंग यांच्यात डेड बॉलच्या नियमावरुन चांगलीच बाचाबाची झाली. 

सिडनी : ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या बॉक्सिंग डे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ आणि मैदानावरील पंच निगेल लॉंग यांच्यात डेड बॉलच्या नियमावरुन चांगलीच बाचाबाची झाली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image

उपहारापूर्वी एकाच षटकात नील वॅगनरने स्मिथला टाकलेल्या दोन चेंडूंवर लेग बाईजच्या धावा नाकारण्यात आल्या. दोन्ही वेळी चेंडू त्याच्या अंगावर लागला मात्र, तो धावायला लागल्यावर पंचांनी चो डेड बॉ घोषित करत त्याला माघारी धाडले. 

उपहारासाठी पॅव्हेलियनमध्ये परतताना स्मिथ आणि लॉंग यांच्यात चांगलाची बाचाबाची झाली. दोघेही तावातावाने एकमेकांशी बोलताना दिसत होते.

Steve Smith

सूर्यग्रहणाचा थेट परिणाम रणजी सामन्यांवर 

स्मिथचा राग योग्य : वॉर्न
पंच चुकीचे आहेत. त्यांच्यावर चिडण्याचा स्मिथला पूर्ण अधिकार आहे. माझ्यामते ब्रेकमध्ये लॉंग यांच्याशी नक्कीच कोणीतरी चर्चा करेल कारण स्मिथ खूप चिडला आहे आणि ते योग्य आहे.  


​ ​

संबंधित बातम्या