राज्य मैदानी स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंचे वर्चस्व

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 November 2019

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील क्रीडा संकुलात झालेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागातील खेळाडूंनी हातोडा फेकमध्ये कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण कॉलेजच्या शिवम जाधवने प्रथम, बांबू उडीत शाहूनगरमधील अजिंक्‍यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अजिंक्‍य यादवने तृतीय, क्रॉस कंट्रीत किसन वीर कॉलेजच्या सुशांत जेधेने द्वितीय, ऋषिकेश किरुळकरने सहावा, लांब उडीत वाईतील किसन वीर महाविद्यालयातील संपदा ढमाळने द्वितीय, किसन वीर कॉलेजमधील आकांक्षा शेलारने द्वितीय, विशाखा साळुंखेने तृतीय, 400 मीटर धावणेत महाराजा सयाजीराव विद्यालयातील स्वराली मोहितेने द्

सातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाद्वारे येथील क्रीडा संकुलात झालेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय मैदानी स्पर्धेत कोल्हापूर विभागातील खेळाडूंनी हातोडा फेकमध्ये कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण कॉलेजच्या शिवम जाधवने प्रथम, बांबू उडीत शाहूनगरमधील अजिंक्‍यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अजिंक्‍य यादवने तृतीय, क्रॉस कंट्रीत किसन वीर कॉलेजच्या सुशांत जेधेने द्वितीय, ऋषिकेश किरुळकरने सहावा, लांब उडीत वाईतील किसन वीर महाविद्यालयातील संपदा ढमाळने द्वितीय, किसन वीर कॉलेजमधील आकांक्षा शेलारने द्वितीय, विशाखा साळुंखेने तृतीय, 400 मीटर धावणेत महाराजा सयाजीराव विद्यालयातील स्वराली मोहितेने द्वितीय क्रमांक मिळवित सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.

कोल्हापूर विभागातील खेळाडूंचे विविध वयाेगटात यश  

स्पर्धेत विविध वयोगटात विविध क्रीडा प्रकारांत कोल्हापूर विभागातील खेळाडूंनी उज्जवल यश मिळविले. यामध्ये 14 वर्षांखालील मुलांच्या गटात 80 मीटर हर्डल्समध्ये राजर्षी शाहू विद्यानिकेतनच्या गुरुप्रसाद खतकरने तृतीय, उंच उडीत कबूनर हायस्कूलच्या सार्थक निंबाळकरने प्रथम, थाळी फेकमध्ये इचलकरंजी हायस्कूलच्या पुष्कर माळीने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या वयोगटातील मुलींत 600 मीटर धावणेत सेंट झेविअर्सच्या सिम्नल पंडितने तृतीय, गोळाफेकमध्ये कुडित्रेमधील श्रीराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या श्‍वेता पाटीलने तृतीय क्रमांक प्राप्त केला.

17 वर्षांखालील गटाचा निकाल असा

स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलांच्या गटात किसन वीर महाविद्यालयातील आदित्य कोचळेने तृतीय, 110 मीटर अडथळा शर्यतीत आझाद विद्यालयातील कुशल मोहितेने प्रथम, राजर्षी शाहू विद्यालयातील सार्थक शेलारने द्वितीय, उंच उडीत इचलकरंजी हायस्कूलमधील अनिकेत मानेने द्वितीय, लांब उडीत नाधवडे हायस्कूलच्या अनिकेत पाटीलने तृतीय, गोळाफेकमध्ये वारणानगरच्या यशवंतराव चव्हाण विद्यालयातील विनायक भोसलेने प्रथम, थाळीफेकमध्ये इचलकरंजीच्या मणेरे हायस्कूलमधील तेजस कानडेने द्वितीय, हातोडा फेकमध्ये कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण कॉलेजच्या शिवम जाधवने प्रथम, चारशे मीटर रिलेत राजर्षी शाहू विद्यालय व निवासी क्रीडा प्रशालामधील अजय सागर, साहिल दळवी, ओंकार सडाके, अविनाश पाटील, सार्थक शेलार यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

मुलींत इचलकरंजीचा दबदबा

या वयोगटातील मुलींत 400 मीटर धावणेत विवेकानंद कॉलेजमधील तितिक्षा पाटोळने प्रथम, उषाराजे हायस्कूलमधील रिया पाटीलने द्वितीय, थाळी फेकमध्ये इचलकरंजीमधील मराठी मीडियम हायस्कूलच्या प्रयंवदा पाटीलने प्रथम, इचलकरंजीच्या डी. के. टी. ई. हायस्कूलच्या अपूर्वा रुसरेकरने द्वितीय, हातोडा फेकमध्ये श्री बालाजी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजमधील चंद्रभागा केर्लेने तृतीय, तसेच चारशे मीटर रिलेत सांगली हायस्कूलच्या दृष्टी पाटील, साक्षी रुपनर, साक्षी दोशी, अमृता कांबळे, श्रेया जाधव यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

19 वर्षांखालील गटाचा निकाल असा

स्पर्धेतील 19 वर्षांखालील मुलांच्या गटात 100 मीटर धावणेत कोडोली हायस्कूलच्या निखिल पाटीलने प्रथम, जयसिंगपूरमधील बळवंतराव झेलो हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या प्रवीण हादीमनीने द्वितीय, 400 मीटर धावणेत संजय घोडावत हायस्कूलच्या महेंद्र चौधरीने प्रथम, 1500 मीटर धावणेत सरवडेतील किसनराव मोरे हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या इंद्रजित फराकटेने तृतीय, 110 मीटर अडथळा शर्यतीत कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधील विकास खोडकेने द्वितीय, गोळाफेकमध्ये वाळवातील हुतात्मा विद्यालयातील प्रफुल्ल थोरातने तृतीय, थाळीफेकमध्ये ओंड येथील पंडित गोविंद वल्लभपंत हायस्कूलच्या अर्जुन ताबवेने प्रथम, कुरकलीमधील भोगावती महाविद्यालय ओंकार मोटेने तृतीय, भालाफेकमध्ये शिवनगरमधील कृष्णा महाविद्यालयातील ऋषिकेश जगतापने द्वितीय, तिहेरी उडीत दूधसाखर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील रोहन कांबळेने द्वितीय, बांबू उडीत शाहूनगरमधील अजिंक्‍यतारा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील अजिंक्‍य यादवने तृतीय, चारशे मीटर रिलेत दूधसाखर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमधील रोहन कांबळे, अक्षय पाटील, सोहन पाटील, अथर्व खोत, ऋषिकेश खोराटेने प्रथम, क्रॉसकंट्रीत किसन वीर कॉलेजच्या सुशांत जेधेने द्वितीय, ऋषिकेश किरुळकरने सहावा क्रमांक मिळविला.

मुलींच्या गटाचा निकाल असा

या वयोगटातील मुलींत 400 मीटर धावणेत महाराजा सयाजीराव विद्यालयातील स्वराली मोहितेने द्वितीय, 1500 मीटर धावणेत नेसरीतील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमधील प्राजक्ता शिंदेने द्वितीय, 100 मीटर अथडळा शर्यतीत विवेकानंद ज्युनिअर कॉलेजमधील श्‍वेता चिकोडीने प्रथम, गोळाफेकमध्ये न्यू इंग्लिश स्कूल व एन. बी. पाटील ज्युनिअर कॉलेजमधील पौर्णिमा भरमगावडाने प्रथम, थाळीफेकमध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील अदिती बुगडने प्रथम, इस्लामपूरच्या के. आर. पी. कन्या विद्यालयातील सिद्धी कराडेने द्वितीय, भालाफेकमध्ये सांगलीतील विलिंग्डज कॉलेजच्या नम्रता कोळीने द्वितीय, लांब उडीत वाईतील किसन वीर महाविद्यालयातील संपदा ढमाळने द्वितीय, उंच उडीत कबनूर हायस्कूलच्या श्रुती कांबळेने प्रथम, व्यंकटश्‍वरा इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रियांका टेकेने द्वितीय, चारशे मीटर रिलेत विवेकानंद ज्युनिअर कॉलेजच्या केशर दड्डे, काजल दड्डे, श्‍वेता चिकोडी, प्रतीक्षा साबळेने द्वितीय, संभाजीराव माने कॉलेजच्या निकिता पाटील, प्रज्ञा शिंदे, जान्हवी मोरे, निकिता तेली, भक्ती मोटेने तृतीय, तसेच क्रॉस कंट्रीत नेसरीतील छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमधील प्राजक्ता शिंदेने प्रथम, किसन वीर कॉलेजमधील आकांक्षा शेलारने द्वितीय, विशाखा साळुंखेने तृतीय, गडहिंग्लजमधील संभाजीराव माने कॉलेजच्या जान्हवी मोरेने चतुर्थ क्रमांक मिळविला.

 


​ ​

संबंधित बातम्या