चिनी म्हटल्यामुळं 'ज्वाला' भडकली!

टीम ई-सकाळ
Wednesday, 10 June 2020

या सर्व घडामोडी घडत असताना भारताकडून बॅडमिंटनचा कोर्ट गाजवलेल्या ज्वाला गुट्टाच्या मनातील चीन विरोधातील संतप्त भावना समोर आली आहे. 

हैदराबाद : कोरोना विषाणूच्या थैमानामुळे जगभरातील बहुतेक लोक चीनवर नाराज आहेत. अशातच चीनने हॉंगकॉंगसाठी नवा राष्ट्रीय सुरक्षा कायदा केल्यामुळे चीनची विस्तारवादी भूमिका जगाला खटकली आहे. काही दिवसांपासून भारत व चीन यांच्यामध्ये असणारा सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चीनच्या या कृतीमुळे साहजिकच अनेक जणांच्या मनात चीनबद्दल नाराजीची भावना निर्माण झाली आहे. परिणामी  चीनच्या उत्पादनावर  बहिष्कार घालण्यापासून ते चीनला संपूर्णपणे वाळीत टाकण्यासंदर्भात सोशल माध्यमातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना भारताकडून बॅडमिंटनचा कोर्ट गाजवलेल्या ज्वाला गुट्टाच्या मनातील चीन विरोधातील संतप्त भावना समोर आली आहे. 

#वर्णभेदाचा_खेळ : भेदभाव नडला अन् 22 वर्ष वनवास भोगला!

भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने इंस्टाग्राम या सोशल माध्यमावर आपला फोटो स्टेटसवर ठेवत एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर एका युझरने ज्वालाला रिप्लाय करत चिनी म्हणून संबोधण्याचा प्रयत्न केला. ज्वालाने या युझरच्या रिप्लायचा स्क्रीनशॉट काढून तो ट्विटर वर पोस्ट करत तिने यासंदर्भात नाराजी व्यक्त केली. चीन विरोधातील मोहिमेचा दाखला देत तिने आपण हाती घेतलेली मोहिम कोणत्या दिशेने नेत आहोत? असा सवालही उपस्थितीत केलाय. ज्वालाच्या या ट्विटनंतर तिला चिनी असे म्हणणाऱ्या युझर्सने माफी मागितली. या युझर्सने ज्वालाला पोस्ट डिलिट करण्याची विनंतीही केली. युझर्सचा माफीनामाही ज्वालाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलाय.  

अमेरिकेला लागलेत क्रिकेटचे 'डोहाळे'; T-20 वर्ल्डकपची करायचीय मेजवाणी  

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिया असते. यापूर्वीही अनेकदा ट्रोल करणाऱ्यांना खणखणीत रिप्लाय दिल्याचे पाहायला मिळाले आहे.  ज्वालाने देशातील  सुधारित नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आपली स्पष्ट भूमिका सोशल माध्यमावर मांडली होती. काही दिवसांपूर्वी कुस्तीपटू बबिता फोगटला दहशतवादी म्हणून संबोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युझरलाही तिने चांगलेच सुनावले होते.


​ ​

संबंधित बातम्या