फर्ग्युसन, सेंट मेरीजचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालय आणि सेंट मेरीजने प्रतिस्पर्ध्यांना हरवून दुसरी फेरी गाठली. 

पुणे : शिक्षण विभाग पुणे महानगरपालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने आयोजित एकोणीस वर्षांखालील मुलांच्या गटाच्या आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत फर्ग्युसन महाविद्यालय आणि सेंट मेरीजने प्रतिस्पर्ध्यांना हरवून दुसरी फेरी गाठली. 

डेक्कन जिमखाना क्‍लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत अरमान माळी (25 गुण) आणि रमेश शिंदेने (23 गुण) केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर फर्ग्युसन महाविद्यालयाने पहिल्या लढतीत सिंबायोसिस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या रंगतदार सामन्यात 69-68 असा एक गुणाच्या फरकाने निसटता पराभव केला. या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी तोडीस तोड खेळ केला. फर्ग्युसनच्या खेळाडूंनी मध्यतरांस मिळविलेली 25-22 अशी तीन गुणांची आघाडी उपयुक्त ठरली. सिंबायोसिसच्या ओम पवारने सर्वाधिक 37 गुण नोंदविले. त्याला सिद्धांत ठोकने (10 गुण) चांगली साथ दिली; परंतु अखेरच्या सत्रात या दोघांना इतरांची विशेष साथ न मिळाल्याने त्यांना पराभव पत्करावा लागला. 

दुसऱ्या सामन्यात सेंट मेरीजने नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचा 28-20 असा आठ गुणांनी पराभव केला. याही सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी जोरदार खेळ केला. मध्यतरांस सेंट मेरीजकडे 9-7 अशी दोन गुणांची आघाडी महत्त्वपूर्ण ठरली. या वेळी विजयी संघाकडून मिल ज्योस, तर पराभूत संघाकडून प्रथम खंडूलाने (7 गुण) सुरेख खेळ केला. 
 


​ ​

संबंधित बातम्या