'त्या'मुळे नाही, 'या'मुळे केली अँजेलो मॅथ्यूजची हकालपट्टी : श्रीलंकेचे प्रशिक्षक

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

आशिया करंडकात श्रालंकेच्या झालेल्या खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरुन काढल्याचे सर्वांना वाटत असतानाच श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

नवी दिल्ली : श्रीलंके क्रिकेट संघात अॅंजेलो मॅथ्यूजच्या कर्णधारपदावरुन सुरु असलेले वादळ थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. आशिया करंडकात झालेल्या खराब कामगिरीच्या पार्श्वभूमीवर अॅंजेलो मॅथ्यूजची कर्णधारपदावरुन हाकलपट्टी करण्यात आली. आशिया करंडकात श्रालंकेच्या झालेल्या खराब कामगिरीमुळे त्याला कर्णधारपदावरुन काढल्याचे सर्वांना वाटत असतानाच श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

"आम्ही आशिया करंडक स्पर्धेतील दोन्ही सामने पराभूत झालो, म्हणून मॅथ्यूजची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली नाही. मात्र, धावा घेत असताना मॅथ्यूजने बराच आळशीपणा दाखवला. त्यामुळे संघाच्या धावा कमी झाल्या आणि अन्य फलंदाजांवर दडपण आले, याच कारणामुळे आम्ही मॅथ्यूजला कर्णधारपदावरून दूर केले आहे," असे श्रीलंकेचे प्रशिक्षक चंडीका हथारुसिंघा यांनी स्पष्ट केले. 

मॅथ्यूजने मात्र याचा विरोध केला आहे. तो म्हणाला, ''मला यात बळीचा बकरा बनविले जात आहे.'' यानंतर होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतही त्याचा समावेश करण्यात आलेला नाही. मॅथ्यूजला कर्णधारपदावरुन काढल्यावर श्रीलंकेचे कर्णधारपद दिेनेश चंडिमलकडे सोपवण्यात आले आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या