French Open Badminton : श्रीकांत, साईनासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान

वृत्तसंस्था
Wednesday, 24 October 2018

मंगळवारपासून सुरु झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत आज भारताच्या तीन खेळाडूंचा अनुभव पणास लागणार आहे. आज पुरुष एकेरीत माजी अव्वल मानांकित किदांबी श्रीकांत, समीर वर्मा, बी साईप्रणित यांचे सामने आहेत.

 पॅरिस : मंगळवारपासून सुरु झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत आज भारताच्या तीन खेळाडूंचा अनुभव पणास लागणार आहे. आज पुरुष एकेरीत माजी अव्वल मानांकित किदांबी श्रीकांत, समीर वर्मा, बी साईप्रणित यांचे सामने आहेत. तसेच महिला एकेरीमध्ये फुलराणी साईना नेहवालचा सामना आहे. मिश्र दुहेरीमध्ये आज सात्विक साईराज रान्कीरेड्डी आणि अश्विनी पोपण्णा यांचा एक सामना आहे तर दुसरा सामना रोहन कपूर आणि कुहू गर्ग यांचा आहे. पुरुष दुहेरीमध्ये आज अत्री मनू आणि सुमित रेड्डी यांचा एक तर सात्विक आणि चिराग शेट्टी यांचा एक सामना होईल, तर महिला दुहेरीमध्ये आज मेघना जक्कमपुडी आणि पूर्वीशा एस राम यांचा सामना आहे. 

स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारताच्या पी.व्ही. सिंधूने जागतिक क्रमवारीत 11 व्या स्थानावर असेल्या अमेरिकेच्या बिवेन झॅंगला पराभूत केले. आज श्रीकांतचा सामना जागतिक क्रमवारीत 22व्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या वॉंग विंग की व्हिन्सेंट याच्याशी आहे. साईना नेहवालचा सामना जागतिक क्रमवारीत 37 व्या स्थानावर असलेल्या साएना कावाकामीशी होणार आहे. समीर वर्मा आणि जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानावर असलेल्या इंडोनेशियाच्या जोनाटन ख्रिस्ती यांच्यात सामना होणार आहे तर साईप्रणित आणि जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावर असलेल्या ब्राझीलच्या योगर सेल्होशी होणार आहे. 

मागील आठवड्यात झालेल्या डेन्मार्क ओपन स्पर्धेत श्रीकांत आणि साईनाने चांगली कामगिरी केली होती. त्यांना या कामगिरीत सातत्य ठेवण्याचे आव्हान असणार आहे. 


​ ​

संबंधित बातम्या