भारताचा श्रीशंकर पात्रता फेरीतच गारद

नरेश शेळके
Friday, 27 September 2019

- जागतिक मैदानी स्पर्धेत भारताची सुरवात निराशजनक झाली. स्पर्धेतील पहिल्याच लांब उडी प्रकारात राष्ट्रीय विक्रमवीर श्रीशंकर मुरली अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. 

-यंदाच्या मोसमात 8.00 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 20 वर्षीय श्रीशंकरला पात्रता फेरीत लयच सापडली नाही. पहिल्या प्रयत्नात तो 7.52 मीटर अंतरावरच उडी मारू शकला.

-महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत अमेरिकेची अजी विल्सन, रेवीन रॉजर्स, युगाडांची विनी नानयोंडो, युक्रेनच्या नतालिया प्रिशचेपा या प्रमुख धावपटूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

दोहा -  जागतिक मैदानी स्पर्धेत भारताची सुरवात निराशजनक झाली. स्पर्धेतील पहिल्याच लांब उडी प्रकारात राष्ट्रीय विक्रमवीर श्रीशंकर मुरली अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. 
यंदाच्या मोसमात 8.00 मीटर अशी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 20 वर्षीय श्रीशंकरला पात्रता फेरीत लयच सापडली नाही. पहिल्या प्रयत्नात तो 7.52 मीटर अंतरावरच उडी मारू शकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने थोडी सुधारणा करीत 7.62 मीटर अशी सुधारणा केली. मात्र, अंतिम फेरी गाठण्यासाठी ही कामगिरी पुरेशी नव्हती. तिसऱ्या प्रयत्नात त्याचा फाऊल झाल्याने 7.62 मीटर ही त्याची कामगिरी सर्वोत्तम धरण्यात आली. त्यानुसार तो प्राथमीक फेरीतील ब गटात 14 स्पर्धकांत 12 वा आणि एकूण 27 स्पर्धकांत 22 वा आला. प्रथम बारा खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. यात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार क्‍युबाचा जुआन मिगेलने 8.40 मीटरची कामगिरी केली. ही 2009 च्या स्पर्धेनंतर पात्रता फेरीत नोंदविलेली सर्वोत्तम उडी होय. 
महिलांच्या आठशे मीटर शर्यतीत अमेरिकेची अजी विल्सन, रेवीन रॉजर्स, युगाडांची विनी नानयोंडो, युक्रेनच्या नतालिया प्रिशचेपा या प्रमुख धावपटूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
------------- 
आठ मीटरपेक्षा अधिक उडी मारून अंतिम फेरी गाठण्याचे ध्येय होते. मात्र, ते पूर्ण होऊ शकले नाही. याचे वाईट जरुर वाटते. पण, निराश निश्‍चित नाही. कारण, अजून मला बरीच मजल मारायची आहे. 
-श्रीशंकर मुरली  
 


​ ​

संबंधित बातम्या