क्रीडामंत्रीच जेव्हा खेळाडूंना जेवण आणून देतात!

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूट सुरुच असून, खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी खुद्द क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड घेत आहेत. राठोड यांनी खेळाडूंना जेवण आणून दिल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंकडून पदकाची लयलूट सुरुच असून, खेळाडूंना कोणताही त्रास होऊ नये याची काळजी खुद्द क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड घेत आहेत. राठोड यांनी खेळाडूंना जेवण आणून दिल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

भारताने आतापर्यंत आशियाई स्पर्धेत आठ सुवर्ण, 13 रौप्य आणि 20 ब्राँझपदके मिळविलेली आहेत. बॅडमिंटन, ऍथलेटिक्स, घोडेस्वारी, टेबल टेनिस या खेळात पहिल्यांदाच पदके मिळाली आहेत. भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ऑलिंपिक पदक विजेते आणि क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड स्वतः जकार्तामध्ये आहेत.

राठोड हे स्वतः खेळाडूंसाठी जेवणाची प्लेट हातात घेऊन खेळाडूंसोबत उभे असल्याचे छायाचित्र सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यानंतर ते खेळाडूंना जेवण देत असल्याचेही दिसत आहे. क्रीडामंत्र्यांची ही वागणूक पाहून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे. एका खेळाडूलाच खेळाडूच्या समस्यांची जाणीव होऊ शकते, अशी भावना ट्विटरवर व्यक्त करण्यात येत आहे.


​ ​

संबंधित बातम्या