लॉकडाऊनमध्ये क्रीडा मैदाने खुली करण्यास केंद्र सरकारची परवानगी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

खेळाडूंच्या सरावासाठी मैदाणे खुली करण्यात आली आहेत. 

कोरोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी जवळपासा दोन महिन्यांपासून सुरु असलेले देशभरातील लॉकडाऊन हे 31 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. याआधी तीन वेळा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काही नव्य सुचना करण्यात आल्या आहेत त्यानुसार स्पोर्ट्स कॉम्लेक्स आणि क्रिकेट स्टेडियम खुले करण्यात आले आहेत मात्र प्रेक्षकांना सांमने पाहण्यास जाण्यासाठी बंदी कायण ठेवण्यात आली आहे. त्यासोबतच अंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनावर देखील बंदी कायम आहे. फक्त खेळाडूंच्या सरावासाठी मैदाणे खुली करण्यात आली आहेत. 

मार्च महिन्यापासून सर्व खेळाडू त्यांच्या घरांमध्ये बंद आहेत. क्रिकेटर तसेच इतर सर्व खेळाडू त्यांच्या घरातच फिटनेस सांभाळताना दिसत आहेत. सध्या स्टेडीयमवर खेळाडूंना सरावाची परवाणगी देण्यात आल्याने खेळाडू घराबाहेर पडून सराव करु शकणार आहेत. जरका आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला तर सामने बंद दाराआड खेळवले जातील 29 मार्चपासून नियोजीत आयपीएल सामने बीसीसीआयनकडून कोरोना व्हायरसची साथ आल्याने अनिश्चीत काळासाठी स्थगीत करण्यात आले आहे. 

जगभरात क्रीडा व्यवहार परत सुरू व्हावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत, जर्मनीमध्ये बुंदेसलिगा ही फुटबॉल लिग प्रेक्षकांविना खेळवण्यात येत आहे, तसेच इंग्लडच्या संघाने नियोजीत कसोटी मालिकेसाठी सराव करण्यास सुरुवात केली आहे. जगभरात क्रीडा संघटना स्पर्धा सुरु करण्यासाठी प्रयत्न करतान दिसत आहेत. मात्र प्रेक्षकांना मैदानत प्रत्येक्षात क्रीडा स्पर्धा पाहात येण्यासाठी अद्याप बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. भारतात कोविड19 चे संक्रमीत रुग्णांचा आकडा 90 हजारांच्या वर पोहचला आहे, तर आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना व्हाययरसमुळे 2 हजार 872 नागरीकांनी त्यांचा जीव गमावला आहे. 
 


​ ​

संबंधित बातम्या