स्पेनच्या विश्वविजेत्या डेव्हिड व्हिलाची फुटबॉलमधून निवृत्ती 

वृत्तसंस्था
Wednesday, 13 November 2019

त्याने आजवर तीन विश्वकरंडक खेळले आहेत. स्पेनने 2010मध्ये विश्वकरंडक जिंकला तेव्हा तो या संघात होता. त्याने स्पेनकडून विक्रमी 59 गोल केले आहेत.​

बार्सिलोना : स्पेनचा स्टार फुटबॉलपटू, सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू डेव्हिड व्हिला यांने फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

INDvsBAN : सहा गडी बाद करण्यापूर्वी चहरने नेट्समध्ये टाकलेले तब्बल एक लाख चेंडू

37 वर्षीय व्हिला सध्या जपानमध्ये व्हिसेल कोब स्पर्धेत खेळत आहे. त्याने बार्सिलोना, ऍटलेटीको माद्रिद आणि व्हेलनसिया या क्लबकडून बहारदार कारकिर्द झाल्यावर आता त्याने फुटबॉलमधून निवृत्ती घोषित केली आहे. 

''मी माझी कारकिर्द थांबवत असल्याचे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेणार आहे. मी बऱ्याच दिवसांपासून याचा विचार करत आहे. माझे कुटुंब आणि माझ्या जवळच्या लोकांशी चर्चा करुन मी हा निर्णय घेतला आहे. माझ्यावर निवृत्ती घेण्यासाठी कोणीही दबाब आणण्यापूर्वी मला निवृत्ती घ्यायची होती.'' भरलेल्या स्वरात त्याने असे पत्रकरांना सांगितले. 

Image result for david villa HD images spain

त्याने आजवर तीन विश्वकरंडक खेळले आहेत. स्पेनने 2010मध्ये विश्वकरंडक जिंकला तेव्हा तो या संघात होता. त्याने स्पेनकडून विक्रमी 59 गोल केले आहेत.

Image result for david villa spain world cup 2010 hd images


​ ​

संबंधित बातम्या