स्पेन, इटलीची युरोत विजयी सलामी 

वृत्तसंस्था
Monday, 25 March 2019

माद्रिद : बुजुर्ग सर्जिओ रामोस याने इटलीस युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेत विजयी केले, तर नवोदित खेळाडूंनी इटलीची मोहीम यशस्वीपणे सुरू केली. विश्वकरंडकाच्या पात्रतेत बाद झाल्यानंतर इटलीने संघाची नव्याने जडणघडण सुरू केल्याने हा विजय त्यांच्यासाठी मोलाचा आहे. 

माद्रिद : बुजुर्ग सर्जिओ रामोस याने इटलीस युरो पात्रता फुटबॉल स्पर्धेत विजयी केले, तर नवोदित खेळाडूंनी इटलीची मोहीम यशस्वीपणे सुरू केली. विश्वकरंडकाच्या पात्रतेत बाद झाल्यानंतर इटलीने संघाची नव्याने जडणघडण सुरू केल्याने हा विजय त्यांच्यासाठी मोलाचा आहे. 

सदोष नेमबाजीचा स्पेनला फटका बसणार, असे वाटत असतानाच सर्जिओ रामोसने मोक्‍याच्या वेळी गोल करीत स्पेनला नॉर्वेविरुद्ध 2-1 असा विजय मिळवून दिला. मध्यरक्षक निकोलो बॅरेला आणि आक्रमक मोईसी कीन यांनी पहिला आंतरराष्ट्रीय गोल करीत इटलीस फिनलंडविरुद्ध 2-0 असा विजय मिळवून दिला. इटलीने मायदेशात दोन वर्षांनंतर पहिला विजय मिळविला. त्याचबरोबर दोन वर्षांत प्रथमच एका सामन्यात दोन गोलही केले. इटलीने 2017 मध्ये विश्वकरंडक पात्रतेत इस्राईलला हरवून आपल्या आशा उंचाविल्या होत्या. पण, तरीही ते पात्रतेतच बाद झाले होते. 

विश्वकरंडक स्पर्धेत रशियाविरुद्धच्या पराभवाने आव्हान संपलेल्या स्पेनने नव्याने मोहीम सुरू केली. नॉर्वेने 65व्या मिनिटास बरोबरी साधून आव्हान किती खडतर आहे, याची जाणीव करून दिली. पण, सहाच मिनिटांत रामोसने पेनल्टी किक सत्कारणी लावली. "जेव्हा शून्यापासून सुरुवात होते, त्या वेळी एक स्वप्न खुणावत असते. आता हा गोल मोहिमेतील सुरवातीचा टप्पा असेल. संघाला गरज असताना गोल करण्याइतका आनंद नाही,' असे रामोसने सांगितले. 

मध्यंतराच्या गोलशून्य बरोबरीनंतर स्वित्झर्लंडने जॉर्जियाचा 2-0 असा पराभव केला. जॉर्जियाने मायदेशातील सात अपराजित लढतींनंतर प्रथमच हार पत्करली. ग्रीसने लिश्‍तनस्तेईनला 2-0 असे नमविले, तर एडन झेकोचा शंभरावा सामना संस्मरणीय करताना बोस्नियाने आर्मेनियाचा 2-1 पाडाव केला. 
 


​ ​

संबंधित बातम्या