दक्षिण कोरियामध्ये आजपासून फुटबॉल के-लीग सुरु 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

जगभारात क्रीडा स्पर्धां स्थगीत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे दक्षिण कोरीयामध्ये सुरु होणारी ही लीग कोरोना व्हायरसमध्ये सुरु असणारी पहिली स्पर्धा असेल.

जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव वाढत आहे मात्र दक्षिण कोरीयामध्ये के-लीग या फुटबॉल लीगची सुरुवात करण्यात आली आहे, सरकारकडून बंद दरवाज्यामागे हे लीग सामने खेळवण्याती परवानगी दिली असून या सामन्यांचे प्रसारण दक्षिण कोरीयाच्या बाहेर देखील करण्यात येणार आहे. टिव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातील लोक या स्पर्धांचा आनंद घेऊ शकणार आहेत. 

कोरोना विष्णुाच्या संसर्गामुळे एकीकडे संपूर्ण क्रीडा क्षेत्र थांबले असले तरी दक्षिण कोरिया मात्र नव्या उमेदीने आणि अनोख्या नियमांसह फुटबॉल सामन्यांना प्रारंभ करण्यासाठी आतुर झालेली आहे. उद्या (शुक्रवार) कोरिया लीगच्या सामन्यांना प्रारंभ होणार असून यावेळी चाहत्यांविना रंगणाऱ्या या सामन्यांत खेळाडूंना हस्तांदोलन करण्याबरोबरच अन्य खेळाडूंशी संवाद साधणे तसेच गोल केल्यानंतर एकमेकांजवळ जाऊन जल्लोष करु नये अशी सक्त ताकदीत देण्यात आलेली आहे. 

"दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूला झाली कोरोना व्हायरसची लागण!"

जगभारात क्रीडा स्पर्धां स्थगीत करण्यात आल्या आहेत, त्यामुळे दक्षिण कोरीयामध्ये सुरु होणारी ही लीग कोरोना व्हायरसमध्ये सुरु असणारी पहिली स्पर्धा असेल. खेळाडूंवना कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सक्त ताकिद देण्यात आली असून, सामन्यादरम्यान खेळाडूना एकमेकांच्या हस्तांदोलन करणे, तसेच एकमेकांच्या जवळ न जाणे, स्पर्ष करणे टाळण्यास बजावण्यात आले आहे.

जगभर थैमान घातलेला कोरोना व्हायरस दक्षिण कोरीयामध्ये तेवढा पसरलेला नाही, य़ा देशभरात दहा हजाराच्या जवळपास लोकांना कोरोना व्हायरसचे संक्रमण झाले आहे, त्यापैकी 9 हजार 484 नागरीक बरे देखील झाले आहेत तर आजवर 256 लोकांनी त्यांचा जीव गमावला आहे. 


​ ​

संबंधित बातम्या