INDvsSA : पुण्यात अवतरली विराटशाही; आफ्रिकेची 3 बाद 36 अशी अवस्था

ज्ञानेश भुरे
Friday, 11 October 2019

पुणे : पेशवाईसाठी प्रसिद्ध अससेल्या पुण्यात शुक्रवारी गहुंजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर विराटशाही अवतली होती. भारतीय क्रिकेटमध्ये सात द्विशतक करणारा फलंदाज, क्रिकेट विश्वात कर्णधार म्हणून सात द्विशतके करणारा पहिला कर्णधार, सात हजार कसोटी धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम असे एक ना अनेक विक्रम रचणाऱ्या विराटने कमालच केली. असे विक्रम पादाक्रांत करत असताना विराटने त्रिशतकाचा मोह टाळून संघहितही जपले आणि भारताचा पहिला डाव 5 बाद 601 धावसंख्येवर घोषित केला. भारताने उभ्या केलेल्या धावांच्या हिमालयासमोर दुसऱ्या दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी अवस्था केली.

पुणे : पेशवाईसाठी प्रसिद्ध अससेल्या पुण्यात शुक्रवारी गहुंजे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर विराटशाही अवतली होती. भारतीय क्रिकेटमध्ये सात द्विशतक करणारा फलंदाज, क्रिकेट विश्वात कर्णधार म्हणून सात द्विशतके करणारा पहिला कर्णधार, सात हजार कसोटी धावांचा टप्पा पार करण्याचा पराक्रम असे एक ना अनेक विक्रम रचणाऱ्या विराटने कमालच केली. असे विक्रम पादाक्रांत करत असताना विराटने त्रिशतकाचा मोह टाळून संघहितही जपले आणि भारताचा पहिला डाव 5 बाद 601 धावसंख्येवर घोषित केला. भारताने उभ्या केलेल्या धावांच्या हिमालयासमोर दुसऱ्या दिवस अखेरीस दक्षिण आफ्रिकेची 3 बाद 36 अशी अवस्था केली. खेळ थांबला तेव्हा थेऊनिस ब्रुईन 20 आणि नाईट वॉचमन अॅन्रिच नॉर्ते 2 धावांवर खेळत होता.  

दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरवात झाली ती गुरुवारी रात्री पडलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर. खेळपट्टी काय रंग दाखवणार याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. स्वभावाप्रमाणे दिवसाच्या सरुवातीच्या सत्रात गोलंदाजांना काहिशी साथ मिळाली. मात्र, त्यानंतर दिवसभर रवींद्र जडेजा बाद होईपर्यंत भारतीय फलंदाजीचेच राज्य होते. भारतीय फलंदाजीचे हे दर्शन खऱ्या अर्थाने विराट ठरले. सकाळी अजिंक्य-कोहली यांचा संयम बघायला मिळाला, दुपारी कोहलीच्या फलंदाजीतील नजाकत आणि गोलंदाजांवरील हुकूमत आणि तिसऱ्या सत्रात कोहलीच्या फलंदाजीला मिळालेली रवींद्र जडेजाची आक्रमक साथ असे भारतीय फलंदाजीतील विविध पैलू बघायला मिळाले. कोहलीचे सातवे शतक, कारकिर्दीमधील सात हजार धावा आणि त्याने चौथ्या विकेटसाठी रहाणे, तसेच पाचव्या विकेटसाठी जडेजाबरोबर केलेल्या शतकी भागीदारी हे भारताच्या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरले.

भारताने पहिल्या सत्रात 83, तर दुसऱ्या सत्रात 117 धावांची भर घातली. शतकानंतर आरामात द्विशतक गाठल्यानंतर कोहलीने आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. त्याला साथ देत जडेजानेही अर्धशतकानंतर शतकाकडे वेगाने कूच केले. अर्धशतकासाठी 79 चेडू घेणाऱ्या जडेजाला नंतर शतकाची घाई झाली. आक्रमक खेळ करताना त्याने नव्वदीत प्रवेश केला. पण, झटपट शतक पूर्ण करण्याच्या नादात जडेजा 91 धावांवर बाद झाला आणि कोहलीने भारताचा डाव सोडण्याचा अपेक्षित निर्णय घेतला. त्या  वेळी कोहली 336 चेंडूत 33 चौकार आणि 2 षटकारांसह 254 धावांवर नाबाद राहिला. कोहलीच्या या  कारकिर्दीमधील सर्वेाच्च धावा ठरल्या. भारताने या अखेरच्या सत्रात 128 धावांची भर घातली. या सत्रात मुथ्थुस्वामीला कोहलीला बाद केल्याचे समाधान मिळाले, पण तो नो-बॉल ठरल्याने त्याचा आनंद क्षणिक ठरला.

सकाळच्या तासभराच्या खेळानंतर भारतीय फलंदाजांनी मोकळेपणाने फलंदाजी केली. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज षटकामागून षटके टाकत राहिले आणि भारतीय फलंदाज त्यांच्यावर राज्य गाजवत गेले. भारतीय फलंदाजांना गारद करण्यासाठी दक्षिण आफ्रिका कर्णधार डु प्लेसी याने अनेक प्रयत्न केले. डीन एल्गर, एडन मार्करम या बदली गोलंदाजांचाही वापर केला. मामत्र, काही फरक पडला नाही. त्यांना दिवसभराच भारताचे केवळ दोनच फलंदाज बाद करता आले. पण,  त्यांनीही त्यांचा घामटा काढला. केशव महाराजने रहाणेला बाद केले. मुथ्थुस्वामीने जडेजाचे शतकाचे स्वप्न मोडले. 

संक्षिप्त धावफलक -
भारत पहिला डाव 156.3 षटकांत 5 बाद 601 (विराट कोहली नाबाद 254 -336 चेंडू, 33 चौकार, 2 षटकार, मयांक अगरवाल 108, रवींद्र जडेजा 91 -104 चेंडू, 8 चौकार, 2 षटकार, अजिंक्य रहाणे 59 -168 चेंडू, 8 चौकार, कागिसो रबाडा 30-3-93-3, केसव महाराज 50-10-196-1, मुथ्थुस्वामी 1-97) दक्षिण आफ्रिका - 15 षटकांत 3 बाद 36 (थेऊनीस ब्रुईन खेळत आहे 20, अॅन्रिच नॉर्टे खेळत आहे 2, उमेश यादव 4-1-16-2, महंमद शमी 3-1-3-1)


​ ​

संबंधित बातम्या