INDvsSA : भारतीय गोलंदाजांचे एक पाऊल पुढे; आफ्रिकेचा निम्मा संघ माघारी

ज्ञानेश भुरे
Saturday, 12 October 2019

 पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभा केल्यावर भारतीय संघाने गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत सामन्यावरील आपली पकड आणखी घट्ट केली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 6 बाद 136 धावा झाल्या होत्या. कर्णधार फाफ डु प्लेसी 52, तर मुथुस्वामी 6 धावांवर खेळत होता. 

पुणे : पहिल्या डावात 601 धावांचा डोंगर उभा केल्यावर भारतीय संघाने गोलंदाजांच्या अचूक कामगिरीच्या जोरावर सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत सामन्यावरील आपली पकड आणखी घट्ट केली. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या 6 बाद 136 धावा झाल्या होत्या. कर्णधार फाफ डु प्लेसी 52, तर मुथुस्वामी 6 धावांवर खेळत होता. 

ज्याला संघातून डावलंल त्यांनेच करुन दाखवलं!

सामन्याच्या पहिल्या दिवसापासून पहिले सत्रा नेहमीच निर्णायक ठरले आहे. दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज अपयशी ठरले, पण भारतीय गोलंदाज एक पाऊल पुढे राहिले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना स्थिरावण्यास वेळच दिला नाही. पहिल्या पाऊण तासाच्या खेळातच त्यांनी थेऊनिस ब्रुईन आणि अॅन्रिच नॉर्टे ही दुसऱ्या दिवस अखेरची नाबाद जोडी परतवून लावली.

त्यानंतर उपाहाराच्या काही क्षण आधी अश्विनने डी कॉकचा अडसर दूर केला. त्यामुळे दक्षिण आफ्रिका संघ पुरता अडचणीत आला. खेळपट्टीवर आता डू प्लेसी आणि मुथुस्वामी ही टिकाव धरू शकणारी अखेरची जोडी असेल. त्यांचा केशव महाराज फलंदाजीला येऊ शकेल की नाही हे निश्चत नाही. काल दुसऱ्या दिवसाचा खेळ झाल्यावर एकदा आणि आज सकाळी असे दोनवेळा त्याच्या खांद्याचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. 

महंमद शमीने खेळपट्टीकडून मिळणाऱ्या बाऊन्सचा सुरेख वापर करून घेत नॉर्टेला कोंडीत पकडले. त्यानंतर उमेश यादवने आपल्या अचूक टप्प्यावरील माऱ्याने ब्रुईनच्या संयमाची कसोटी पाहिली. निम्मा संघ पन्नाशीत बाद झाल्यावर दक्षिण आफ्रिका संघावरील दडपण नक्कीच वाढले. कर्णधार डू प्लेसीस आणि डी कॉक ही त्यांची खेळपट्टीवर टिकाव धरू शकणारी अखेरची जोडी होती. भारतीय खेळपट्ट्या आणि गोलंदाजांचा चांगला अनुभवही असल्यामुळे त्यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या.

जडेजा आणि अश्विनच्या फिरकीचा त्यांनी धीराने सामना केला. मात्र, गोलंदाजी करण्याची बाजू बदलल्यानंतर अश्विनच्या अचूकतेला यश आले. खोलवर टप्पा पडलेला अश्विनचा चेंडू झपकन वळला आणि बेलवर आदळला. भारतीय खेळाडू विकेटच्या जल्लोषात असतानाच डी कॉक मात्र बेल चेंडूच्या धक्क्याने पडल्या, की यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ह्जच्या धक्क्याने या विचारात खेळपट्टीवरट थांबून होता. 

Image

भारतातील खेळपट्ट्या बोअरींग; हा तर धडधडीत आरोप करतोय

उपाहाराच्या दक्षिण आफ्रिकने आणखी एक गडी गमावला होता. पण, जडेजाच्या गोलंदाजीवर शॉर्ट मिडविकेटवर कोहलीला मुथुस्वामी एक अवघड झेल घेता आला नाही. कोहलीने प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. आता डू प्लेसीस आपल्या संघासाठी किती मोठी खेळी करतो यावर त्यांचा सामन्यातील टिकाव अवलंबून असेल. भारताकडून आतापर्यंत उमेश यादवने तीन, शमीने  दोन, तर अश्विनने एक गडी बाद केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या