ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

आफ्रिकेत तीन टी20 सामन्यांची मालीकी खेळण्यात येणार आहे.

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, त्यामुळे सगळ्या क्रीडा स्पर्धा रद्द किंवा स्थागीत करण्यात आल्या आहेत, त्यासोबतच भविष्यातील स्पर्धांच्या आयोजनाबद्दल अनिश्चीतात आहेत. भारतीय क्रिकेट बोर्ड क्रिकेट स्पर्धांच्या आयोजनासाठी वेगवेगळ्या पर्यांयांचा विचार करत आहे. नुकतेच क्रिकेट खेळाडूंना वयक्तिक सराव करण्याची परवाणगी देण्यात आली आहे. या माहामारीच्या काळात दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डने भारतीय संघ ऑगस्ट महिन्याच्या शेवटी क्रिकेट खेळण्यासाठी आफ्रिकेत तीन टी20 सामन्यांची मालीकी खेळेल अशी आशा व्यक्त केली आहे. 

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड ने सांगीतले की, आम्ही या मालिकेसाठी नव्या तारखांचे नियोजन करत आहोत, भारत-दक्षिण आफ्रिकेच्या ही मालीका होण्याआधी आफ्रिकेचा संघ वेस्ट इंडीज दौरा करणार आहे. भारतसोबत होणाऱ्या सामन्यांसाठी आफ्रिका संघाला वेस्ट इंडीज दौऱ्याच्या तारखादेखील बदलाव्या लागणार आहेत. याआधी दक्षिण आफ्रिका संघाचा श्रीलंका दौरा रद्द करण्यात आला आहे. 

"मान्सून संपल्यावरच क्रिकेट पुन्हा सुरु होईल! "

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड या मालिकाचे आयोजन होण्यासाठी तसत बीसीसीआयच्या संपर्कात असून बीसीसीआय कडून तीन टी20 सामन्याच्या मलीकेसीठी होकार दिला आहे असे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे निर्देशक ग्रॅम स्मिथ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. “स्पर्धेच्या आयोजनबद्दल सध्या काही शंका आहेत, ऑगस्ट महिन्यामध्ये जगभरतील परिस्थीती कशी असेल हे सांगता येत नाही, पण सामाजिक अंतर ठेवत बंद दाराआड आपण क्रिकेट खेळू शकतो” असे मत त्यांनी व्यक्त केले. 

भारतात सध्या बीसीसीयने कोरोनाचा वाढता प्रभाव पाहाता आयपीएल अनिश्चीत काळासाठी स्थगीत केले आहे. येत्या ऑक्टोबर- नोहेंबर दरम्यान आयपीएलच्या आयोजनाचा विचार बीसीसीआय करत आहे. सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक कोलमडले आहे. सर्व स्पर्धांची आयोजने ही येत्या काळातील परिस्थीतीवर अवलंबून आहेत. 


​ ​

संबंधित बातम्या