विराटने संघातील हुकमी खेळाडूंचा शोध घ्यावा : गांगुली

वृत्तसंस्था
Friday, 14 September 2018

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला संघातील खेळाडूंवर विश्वास ठेऊन त्यांच्यातील हुकमी खेळाडूंचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे. 

नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने भारताचा कर्णधार विराट कोहलीला संघातील खेळाडूंवर विश्वास ठेऊन त्यांच्यातील हुकमी खेळाडूंचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे. 

तो म्हणाला, ''संघाचे काय चुकले हे शोधण्यापेक्षा संघातील कौशल्याचा शोध घेणे गरजेचे आहे. चेतेश्व पुजारा, लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी ज्या प्रकारे इंग्लंड दौऱ्यात फलंदाजी केली आहे ते पाहता ते उत्तम क्रिकेटपटू आहेत याची मला खात्री आहे. कोहलीने स्वत:सोबतच इतर खेळाडूंना सर्वोत्तम खेळण्यासाठी प्रवृत्त करायला हवे. एक कर्णधार म्हणून कोहलीने प्रत्येक खेळाडूवर विश्वास ठेऊन, मला तू संघासाठी सामना जिंकायला हवा आहेस असे सांगयला हवे, असे केल्यास सर्वांचा खेळ आपोआप बहरेल.''

निवड समितीने चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना पाठिंबा देण्याची गरज आहे. संघात जागेसाठी स्पर्धा असणे गरजेचे आहे मात्र त्या स्पर्धेचे खेळाडूंवर दडपण येऊ न देणे सुद्धा गरजेचे आहे. ''परदेशात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारतात खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे. लोकेश राहुलने इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली आहेत त्यामुळे त्याला भारतात खेळण्याची संधी मिळायला  हवी. खेळाडूंवर दडपण असावे पण त्या दडपणाचा त्यांच्या कामगिरीवर परिणाम होता कामा नाही,'' असे मत त्याने व्यक्त केले. 

''संघाला गरज असताना सकारात्मक खेळ करण्याची गरज असते आणि राहुल, पंत आणि रहाणे यांनी अगदी तेच केले. त्यांनी दाखवलेल्या सकारात्मकतेला दाद द्यायलाच हवी,'' असेही त्याने सांगितले.  


​ ​

संबंधित बातम्या