'दादाचे गडी विराट सेनेवर भारी पडतील'

टीम ई-सकाळ
Wednesday, 1 July 2020

आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला विराट कोहली कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मागील वर्षी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील विजयासह विराटे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले होते.

नवी दिल्ली : माजी क्रिकेटर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि विद्यमान कर्णधार विराट कोहलीच्या संघाची तुलना केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीचा संघ आताच्या कसोटी संघावर भारी पडले. एवढेच नाही तर ते जिंकतील, असे आकाश चोप्रा यांनी म्हटले आहे. स्पोर्टकीडा या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी भारतीय क्रिकेट संघातील आजी-माजी नेतृत्वावर भाष्य केले.  2018-19 मध्ये विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने   ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर छाप सोडण्याचा प्रयत्न केला. दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला मालिका गमावण्याची वेळ आली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्येही संघाला पराभवाचा सामना करावा लागला, या गोष्टींचा उल्लेख आकाश चोप्रा यांनी केला.

भारतीय संघाच्या नेतृत्वासाठी रोहित शर्मा रेडीमेड ऑप्शन
 

गांगुलीने भारतीय संघाला परदेशी खेळपट्टीवर जिंकण्याची सवय लावली, असेही आकाश चोप्रा यावेळी म्हणाले. गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये मालिका जिंकल्या. एवढेच नाहीत तर ऑस्ट्रेलियात कसोटी अनिर्णित राखण्यात यश मिळवले, असाही उल्लेख त्यांनी केला. आकडेवारीनुसार सध्याच्या घडीला विराट कोहली कसोटीतील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. मागील वर्षी वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील विजयासह विराटे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले होते.

'धमक असणारा गोलंदाज लाळेशिवाय आमचा चेंडू स्विंग करु शकेल'
 

आयसीसी टेस्ट चॅम्पियनमध्येही विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ अव्वलस्थावर आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या 0-2 अशा पराभवानंतर भारताच्या खात्यात 360 गुण जमा आहेत, असे असले तरी आकाश चोप्रा यांनी सौरव गांगुलीचा संघ मजबूत वाटतो.
 
सौरव गांगुली टेस्ट इलेव्हन-

वीरेंद्र सेहवाग, आकाश चोप्रा, राहुल द्रविड, सचिन तेंदुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली, पार्टिव पटेल, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, जहीर खान, अजित आगरकर. 

विराट कोहली टेस्ट इलेव्हन-

रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हमुमा विहारी, वृद्धिमान साहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी/जसप्रीत बुमराह. 


​ ​

संबंधित बातम्या