Asia Cup 2018 : गांगुली म्हणतो, विराट नसला तरी फरक पडत नाही

वृत्तसंस्था
Tuesday, 18 September 2018

आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान हा सर्वाधिक 'हाय व्होल्टेज' सामना मानला जातो. या सामन्यात दोन्ही संघाना सर्वोत्तम खेळ करण्यची गरज आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीची अनुपस्थिती जाणवणार नाही असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे.a

दुबई : आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान हा सर्वाधिक 'हाय व्होल्टेज' सामना मानला जातो. या सामन्यात दोन्ही संघाना सर्वोत्तम खेळ करण्यची गरज आहे. मात्र या सामन्यात भारतीय संघाला विराट कोहलीची अनुपस्थिती जाणवणार नाही असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीने व्यक्त केले आहे.

आशिया करंडकात भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील सामना अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना विजयाची समान संधी असल्याचेही सौरभ गांगुलीने स्पष्ट केले. कोलकात्यात एका खासगी सोहळ्यात तो पत्रकारांशी बोलत होता.

आशिया खंडात सध्या भारतीय संघ सर्वोत्तम असून भारताने आजवर सहावेळा आशिया करंडक जिंकला आहे. पाकिस्तानने दोनवेळा आशिया करंडकाचे विजेतेपदा पटकावले आहे. इंग्लंड दौऱ्यानंतर संघ व्यवस्थापनाने भारताचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या खांद्यावर भारतीय संघाची धुरा सोपवण्यात आली आहे.  कोहलीच्या अनुपस्थितीचा मात्र संघावर फारसा परिणाम होणार नाही असे गांगुली म्हणाला.

भारताने हाँगकाँगविरुद्धचा सामना जिंकल्यास सुपर फोर गटात त्यांची जागा नक्की होणार आहे. त्यामुळे भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या निकालाचा भारताच्या आव्हानावर कोणताही फरक पडणार नाही.

संबंधित बातम्या