किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

सुशांत जाधव
Friday, 10 July 2020

2011 मध्ये गौतम गंभीर यांच्याकडे संघाची धूरा देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली  2012 आणि 2014 च्या हंगामात केकेआरने आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. शाहरुख खानने निर्णय घेण्यामध्ये दिलेल्या स्वातंत्र्यामुळे संघाची कामगिरी सुधारली, असे गंभीर यांनी काही दिवसांपुर्वीच सांगितले होते. शाहरुखने ही मुभा गांगुली यांना दिली नव्हती.  

कोलकाता : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा पहिला हंगाम 2008 मध्ये रंगला होता. यावेळी प्रिंस ऑफ कोलकाता आणि भारतीय संघाची खऱ्या अर्थाने बांधणी करणाऱ्या सौरव गांगुली यांनी कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली कोलकाताचा संघ दमदार कामगिरी करेल अशी आस होती. पण कोलकाताच्या संघाला फार काही करिश्मा करता आला नव्हता. सौरव गांगलु यांच्या नेतृत्वाखाली संघाला गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. यावेळी गांगली यांना  संघाचे व्यवस्थापन मंडळी आणि अन्य काही अडचणींचा सामना करावा लागला होता. खुद्द गांगुली यांनीच एका मुलाखतीमध्ये यासंदर्भात भाष्य केले.  

...तरच सुरू होईल देशातील क्रिकेट कशाबद्दल गांगुली म्हणालेत ते वाचा

शाहरुखच्या मालकीचा केकेआरच्या संघाने ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक डॉन बुकानन यांची नियुक्ती केली होती. त्यांनी मल्टी कॅप्टनसी धोरण अवलंबले. त्यामुळे संघाला सुरुवातीच्या काळात अपयश मिळाले. सलग दुसऱ्या वर्षी संघाने खराब कामगिरी केल्यानंतर बुकानन यांना पदावरुन काढून टाकण्यात आले. दुसऱ्या हंगामा ब्रँडम मॅक्युलमकडे देण्यात आलेले नेतृत्व तिसऱ्या हंगामात पुन्हा गांगुली यांच्याकडे आले. पण तेव्हाही संघाला म्हणावे तसे यश मिळाले नव्हते. त्यानंतर 2011 मध्ये गौतम गंभीर यांच्याकडे संघाची धूरा देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली  2012 आणि 2014 च्या हंगामात केकेआरने आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. शाहरुख खानने निर्णय घेण्यामध्ये दिलेल्या स्वातंत्र्यामुळे संघाची कामगिरी सुधारली, असे गंभीर यांनी काही दिवसांपुर्वीच सांगितले होते. शाहरुखने ही मुभा गांगुली यांना दिली नव्हती.  

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

केकेआरचे नेतृत्व करताना संघ मालक असलेल्या शाहरुखकडे फ्रीडम मिळावे, अशी मागणी केली होती. पण त्याने या गोष्टीला नकार दिला होता.  गौतम भट्टाचार्जीच्या यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीमध्ये सौरव गांगुली यांनी कोलकाता संघाचे नेतृत्व करताना आलेल्या अडचणीवर भाष्य केले. गांगुली म्हणाले की,  'मी नुकतेच गौतम गंभीरची एक मुलाखत ऐकली.  संघाच्या रणनितीसंदर्भात कोणताही हस्तक्षेप करणार नाही, असा शब्द शाहरुखने दिल्याचे गंभीर म्हणाला. तुझी टिम आहे तू सांभाळ असेही शाहरुख म्हटल्याचे गंभीरने सांगितले. मी हिच गोष्ट त्याला पहिल्या हंगामात सांगण्याचा प्रयत्न केला. पण माझे शाहरुखने ऐकले नव्हते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी संघ मालकांनी खेळाडूंना स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी चेन्नई आणि मुंबई इंडियन्सचा यशाचा दाखलाही दिला.  
 


​ ​

संबंधित बातम्या