संघाची निवड नक्की करतं कोण? रोहित की शास्त्री? : गांगुली 

वृत्तसंस्था
Tuesday, 25 September 2018

क्रिकेट म्हणजे फुटबॉल नसून येथे मार्गदर्शकापेक्षा कर्णधाराला जास्त महत्त्व असते. मार्गदर्शकाने क्रिकेटमध्ये 'बॅक सीट' घ्यावे असे म्हणत गांगुलीने भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्रींवर टिका केली आहे. 

पुणे : क्रिकेट म्हणजे फुटबॉल नसून येथे मार्गदर्शकापेक्षा कर्णधाराला जास्त महत्त्व असते. मार्गदर्शकाने क्रिकेटमध्ये 'बॅक सीट' घ्यावे असे म्हणत गांगुलीने भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्रींवर टिका केली आहे. 

पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये तो बोलत होता. 'A Century is not Enough' या त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तो पुण्यात आला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला, ''क्रिकेट म्हणजे फुटबॉल नव्हे. आताच्या मार्गदर्शकांना आपण फुटबॉल संघासारखेच क्रिकेटचा पूर्ण संघ चालवणार असल्याचे वाटते. मात्र क्रिकेट हा कर्णधाराचा खेळ असून मार्गदर्शकाने 'बॅक सीट' घेणे महत्त्वाचे असते.''

''संघातील खेळाडूंचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य मार्गदर्शकाकडे असणे गरजेचे आहे. तसेच रवी शास्त्रीला सध्या एक प्रश्न विचारायचा झाल्यास कोणता विचारणार या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला, ''संघाची निवड नक्की कोण करतं? रोहित (भारताचा सध्याचा कर्णधार) की स्वत: शास्त्री? 

इंग्लंड दौऱ्यानंतर शास्त्रींना भारताच्या मार्गदर्शक पदावरुन काढण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.


​ ​

संबंधित बातम्या