भारतीय संघ 300 धावाही चेस करू शकतो : गांगुली

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी 250 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवण्याच्या तयारीत असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघ 300 धावाही चेस करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

नवी दिल्ली : इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यात भारतासमोर विजयासाठी 250 हून अधिक धावांचे लक्ष्य ठेवण्याच्या तयारीत असताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघ 300 धावाही चेस करू शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पिछाडीवर आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे. अन्यथा भारतीय संघाला 3-1 असा पराभव स्वीकारावा लागणार आहे. भारतीय संघाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने भारतीय क्रिकेटपटूंना आपला खेळ उंचावून विजयी लक्ष्याचा पाठलाग करणे गरजेचे आहे.

गांगुलीनेही देखील भारतीय संघावर विश्वास दाखवत ट्विट केले आहे, की भारतीय संघ 300 धावांचा पाठलाग करू शकत नाही, असे समजू नका. भारतीय संघ खूप प्रतिभा असून, ते हे करू शकतात.


​ ​

संबंधित बातम्या