आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी सौरव गांगुली प्रमुख दावेदार 

टीम ई-सकाळ
Thursday, 2 July 2020

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी नकार देणाऱ्या शशांक मनोहर यांनी काल बुधवारी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी उपाध्यक्ष इमरान ख्वाजा यांच्याकडे आली आहे. आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रानुसार आयसीसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपर्यंत ते हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहतील. शशांक मनोहर हे मागील दोन वर्षांपासून अध्यक्षपदावर होते. आयसीसीच्या नियमावलीनुसार, अध्यक्षपदी तीन वर्ष कारभार पाहणे शक्य आहे. यानुसार ते आणखी एक वर्ष या पदावर विराजमान राहू शकले असते. पण त्यांनी पदमुक्त होण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे आता लवकरच आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. 

ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील तिसऱ्या बॉक्सिंग डे टेस्ट वर कोरोनाचे सावट 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली हे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. त्यामुळे सौरव गांगुलीने आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीत सहभाग घेतल्यास, त्याची टक्कर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कॉलिन ग्रावेस यांच्याशी होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाचे प्रमुख 72 वर्षीय कॉलिन ग्रावेस हे देखील अध्यक्षपदासाठी म्हणून प्रबळ दावेदार आहेत. वेस्ट इंडीज बोर्डाचे माजी  प्रमुख डेव कॅमेरून, न्यूझीलंडचे ग्रेगोर बार्क्ले, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाचे ख्रिस नानजानी यांनीही आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी रस दाखविला आहे. तसेच उपाध्यक्षपदावर असलेले हाँगकाँगचे इमरान ख्वाजा हे देखील आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. मात्र त्यांना पूर्णकालीन सदस्यत्वासाठी समर्थन मिळाले नाही.

2011 वर्ल्डकप फिक्सिंग प्रकरण : डी सिल्वाची कसून चौकशी, आता उपुल थरंगाचा नंबर ?   

कोरोनाच्या आजारामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. यासोबतच अनेक देशांच्या क्रिकेट मंडळाचे आर्थिक गणित कोरोनामुळे बिघडले आहे. त्यामुळे या कठीण काळात क्रिकेट जगतातील परिस्थिती हाताळण्यासाठी सौरव गांगुली हा आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी योग्य नेतृत्व असल्याचे अनेक जणांनी म्हटले आहे. तसेच राज्यातील क्रिकेट मंडळात व बीसीसीआय मध्ये मिळून सौरव गांगुलीचा सहा वर्षांचा कार्यकाळ या महिन्यातील 31 जुलै रोजी संपणार आहे. 

सेरी ए फुटबॉल : जीनोआ विरुद्ध क्रिस्टियानो रोनाल्डोचा रॉकेट गोल  

दरम्यान,  विश्वचषक ट्वेंटी 20 स्पर्धेबाबत आयसीसीचा अंतिम निर्णय होत नसल्याने भारतीय क्रिकेट मंडळास आयपीएलबाबतची प्रक्रिया सुरू करणे अवघड झाले होते. या स्पर्धेचा निर्णय शशांक मनोहर सातत्याने लांबवत होते. त्यामुळे त्यांचा आणि भारतीय क्रिकेट मंडळाचा गेल्या काही महिन्यात सातत्याने खटका उडत होता. त्यानंतर विश्वचषक ट्वेंटी 20 चा अंतिम निर्णय आयसीसी लांबवत असल्यामुळे, भारतीय क्रिकेट मंडळ शशांक मनोहर यांच्यावर नाराज असल्याची माहिती मिळाली होती.  

 

 


​ ​

संबंधित बातम्या