गौतम गंभीर पुन्हा धोनीला भिडला..म्हणतो, धोनीने जिंकल्या ट्रॉफ्या पण संघ उभारला होता गांगुलीने

शैलेश नागवेकर
Saturday, 11 July 2020

2011 च्या विश्वकरंडक विजेतेपदाच्या संघात सचिन तेंडुलकर, आपण स्वतः. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि विराट कोहली असे तगडे फलंदाज होते. गांगुलीला त्याच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्यास झगडावे लागले, असे गंभीर म्हणतो.

नवी दिल्ली,  ः महेंद्रसिंग धोनीने जिंकलेल्या दोन्ही विश्वकरंडक स्पर्धेत त्याचा सहकारी असलेला गौतम गंभीर धोनीपासून नेहमीच फटकून वागतो. धोनीने ज्या ट्रॉफीज जिंकल्या आहेत त्याचा पाया सौरव गांगुलीने रचलेला आहे, असे मत गंभीरने व्यक्त केले आहे. कसोटी क्रमवारीतही धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने प्रथम क्रमांक मिळवलेला होता, एकूणच धोनीने जे यश मिळवले  त्याचे श्रेय वेगवान गोलंदाज झहीर खानला जाते. माझ्या मते झहीर खान हा देशातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज होता असे गंभीरने म्हटले आहे.

किंग खाननं गंभीरला दिलेली मुभा दादाला दिली नव्हती

धोनी हा नशिबवान कर्णधार होता कारण तिन्ही प्रकारात त्याला सर्वोत्तम संघ मिळाला. 2011 च्या विश्वकरंडक विजेतेपदाच्या संघात सचिन तेंडुलकर, आपण स्वतः. वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि विराट कोहली असे तगडे फलंदाज होते. गांगुलीला त्याच्या नेतृत्वाखाली संघ तयार करण्यास झगडावे लागले, असे गंभीर म्हणतो.

क्रीडा विषयक सविस्तर बातम्यांसाठी फॉलो करा   आणि लाइकसह शेअर करायलाही विसरु नका  

2011 च्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनीच्या एका षटकाराने आम्ही जिंकलो नव्हतो तर संपूर्ण संघाने एकत्रितपणे केलेल्या कामगिरीमुळे ते यश मिळाले होते. असे सांगताना गंभीरने धोनीच्या त्या षटकाराची क्लिप वारंवार दाखवली जाते त्यावरही टीका केलेली आहे. त्या अंतिम सामन्यात सेहवाग आणि तेंडुलकर लवकर बाद झाल्यावर गंभीरने ९७ धावांची निर्णयक खेळी केली होती. तर धोनीने क्रमवारीत बढती घेत नाबाद 91 धावा केल्या होत्या. तो वर्ल्डकप भारतीयांनी भारतीयांसाठी आणि भारतीयांसह जिंकला होता, असेही ट्विट गंभीरने केलेले आहे.


​ ​

संबंधित बातम्या