कोरोना मुळे सौरव गांगुली देखील आहे सुट्टीवर...  

सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 March 2020

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असल्याने सगळीकडे भितीचे सावट आहे.विविध देशातील नागरिकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश विविध उपाययोजना करत या व्हायरसशी झुंजत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असल्याने सगळीकडे भितीचे सावट आहे.विविध देशातील नागरिकांना कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश विविध उपाययोजना करत या व्हायरसशी झुंजत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

बांगलादेशची ऑफर बांगर यांनी नाकारली

अनेक स्पर्धा, विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.अनेकांनी घरात राहाणे पसंद केले आहे. क्रिकेटच्या वेळापत्रकाक सदैव व्यस्त असणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पदाधिकारी आणि अधिकारी वर्गाला करोनामुळे सध्या मोकळा वेळ मिळाला आहे. BCCI अध्यक्ष माजी कर्णधार सौरव गांगुली याने नुकताच एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत तो नुसताच बसला असल्याचे दिसत आहे. "संपुर्ण जग करोना व्हायरसच्या भीतीपोटी शांत आहे. माझ्या घराच्या लाऊंजमध्ये संध्याकाळी ५ वाजता मी काहीही काम न करता एकदम निवांत  बसलो आहे. या आधी असा निवांत वेळ मला कधी मिळाला होता आठवतंही नाही." असे सौरवने आपल्या फोटोला कॅप्शन दिले आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Amids all the corona virus scare .. happy to sit in the lounge at 5pm .. free... can’t remember when I did last ..

A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly) on

 

युरो फुटबॉल स्पर्धा कधी होणार? वाचा!

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवाचा फटका अनेक क्रीडा स्पर्धांना सध्या बसला आहे. करोनाच्या धडकीने IPL सामन्यांचे चे आयोजनही लांबणीवर पडले आहे. त्यामुळे बीसीसीआयने अनेक महत्वाच्या स्पर्धा स्थगित केल्या आहेत. तसेच बीसीसीआयने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आपल्या मुंबईतील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची करण्याची परवानगी दिली आहे.


​ ​

संबंधित बातम्या