सौरव गांगुलीकडूनही 'त्या' नियमाचा भंग?

टीम ई-सकाळ
Monday, 6 July 2020

जेएसडब्ल्यू कंपनीने आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाची मालकी घेतली असल्यामुळे गांगुलीच्या हितसंबंधांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : एकीकडे विराट कोहलीची दुहेरी हितसंबंधांसंदर्भात तक्रार करण्यात आलेली असताना दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्याबाबतही प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत. गांगुली जेएसडब्ल्यू सिमेंटच्या ब्रँडची जाहिरात करत असल्याचे आरोप आहेत. जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने गांगुलीसह भारतीय फुटबॉल कर्णधार सुनील छेत्री  यांच्याशी `सदिच्छा दूत` असा नुकताच करार केलेला आहे. जेएसडब्ल्यू कंपनीने आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाची मालकी घेतली असल्यामुळे गांगुलीच्या हितसंबंधांचा प्रश्न निर्माण झाला आहे.

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

सौरव गांगुलीने मात्र आपल्याकडून कोणताही दुहेरी हितंसंबंधांच्या अटीचा भंग झालेला नसल्याचे स्पष्ट केले.  दिल्ली कॅपिटल संघाचा मी दोन वर्षांपूर्वी मेंटॉर होतो; त्यामुळे आत्ता जेएसडब्ल्यूचे सदिच्छा दूत आणि बीसीसीआयचे अध्यक्षपद या दोन जबाबदाऱ्यांचा संबंध येत नाही, असे गांगुलींचे म्हणणे आहे. मुळात जेएसडब्ल्यूची सिमेंट कंपनी ही दिल्ली कॅपिटल संघाचे फ्रँचाईसी नाहीत. जेएसडब्ल्यू स्पोर्टस ही कंपनी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल संघाचे मालक आहेत आणि माझा जेएसडब्ल्यू स्पोर्टसची संबंध नाही, असेही गांगुलींने स्पष्ट केले.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

हे तर दुहेरी हितसंबंधच

गांगुलींनी आरोप फेटाळले असले, तरी तज्ज्ञांच्या मते गांगुलीच्या या दोन्ही जबाबदाऱ्या दुहेरी हितसंबंधांमध्ये मोडत आहेत. गांगुली यांच्याबाबत या अगोदरही हे मुद्दे उपस्थित झालेले आहेत. बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेली व्यक्ती कोणत्याही ब्रँडची जाहिरात करू शकत नाही, असे सांगितले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या