एक प्यार का 'नगमा'... गाण्यामुळे नव्हे अभिनेत्रीमुळे दादा आला होता अडचणीत

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

डोना यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर दोन वर्षानंतर 1999 विश्वचषकाच्या दरम्यान लंडनमध्ये नगमा-सौरव यांची भेट झाली होती.

क्रिकेटर आणि बॉलिवूड यांच्यातील मैत्रीची आणि लव्ह अफेअरची चर्चा नवी नाही. भारतीय संघाचा माजी क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीन ते विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि अनेक खेळाडूंची नावे बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडली गेली. विराट-अनुष्का दोघे विवाहबद्धही झाले. नुकताच हार्दिक पांड्याची बॉलिवूड तारकेनं विकेट घेतल्याचे पाहायला मिळाले. याशिवायही अनेक क्रिकेटर्सचे बॉलिवूड अभिनेत्रींशी प्रेम प्रकरण असल्याची चर्चाही रंगल्याचे पाहायला मिळाले. भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावणारा दादाही अभिनेत्रीसोबतच्या प्रेम प्रकरणामुळे चर्चेत आला होता. आयुष्यातील प्रेमाचा त्रिकोणामुळे गांगुली चांगलाच अडचणीत सापडला होता.

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

भारतीय क्रिकेट संघाची बांधणी करण्याचे श्रेय विद्यमान बीसीसीआयचा अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीला जाते. मैदानातील खेळासोबतच वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. 1997 मध्ये गांगुलीने कुटुंबियांच्या विरोधात जाऊन आपली लहानपणापासूनची मैत्रीण असलेल्या डोनाशी विवाह केला. गांगुली-डोना जोडी आजही अनेक जणांसाठी एक आदर्श कपल आहे. या दोघांच्या प्रेम कहाणीमध्ये नगमाची एन्ट्री झाल्याची चर्चा रंगली होती. दाक्षिणात्य चित्रपटासह बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटवणाऱ्या आणि सध्याच्या घडीला राजकारणात सक्रीय असलेल्या  नगमा (Nagma) यांच्यासोबत सौरव गांगुलीचे नाव जोडले गेले. 

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डोना यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर दोन वर्षानंतर 1999 विश्वचषकाच्या दरम्यान लंडनमध्ये नगमा-सौरव यांची भेट झाली होती. त्यानंतर या दोघांच्या भेटीची चांगलीच चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगण्यास सुरुवात झाली. चेन्नईमधील एका मंदिरात दोघे भेटल्याच्या बातम्याही आल्या होत्या. सौरव आणि नगमा या दोघांनी या विषयावर त्यावेळी मौनच बाळगल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणामुळे गांगुलीच्या संसारच संकटात आला होता. डोना यांच्या मनात गांगुलीपासून वेगळे होण्याचा विचारही आला. पण धैर्य दाखवत त्यांनी पार्टनरशीप टिकवण्यावर भर दिला. डोना यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत गांगुलीला सावरलेच असे म्हणावे लागेल. अभिनेत्री आणि काँग्रेस नेता नगमा यांनी काही वर्षांपूर्वी सौरव गांगुलीसोबत अफेअर होते, अशी कबुली दिली होती. काहीवेळ आम्ही एकत्र होता. त्यानंतर आमच्यात ब्रेकअप झाल्याचे नगमा यांनी सांगितले होते.  


​ ​

संबंधित बातम्या