धोनीनं खूप ट्रॉफ्या जिंकून दिल्या असल्या तरी... माझं मत दादालाच!

सुशांत जाधव
Sunday, 19 July 2020

दोन्ही कर्णधारांची तुलना करताना पार्थिव म्हणाला की, एकाने अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर दुसऱ्याने मजबूत संघ बांधणी केलीय.

नवी दिल्ली : बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाची तुलना भारतीय क्रिकेटमध्ये नवी नाही. या दोन कर्णधारांमधील नेमका फरक काय होता यावर काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरने भाष्यही केले होते. त्यानंतर आता भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलने दोघांच्या नेतृत्वातील वेगळेपण सांगितले आहे.  गौतम गंभीर यांनी भारतीय संघ बांधणीमध्ये सौरव गांगुलीचं योगदान धोनीपेक्षा अधिक असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर धोनीला तयार संघ मिळाल्याचा उल्लेखही गंभीरने केल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता धोनी आणि गांगुली यांच्यापैकी कोणाचे नेतृत्व अधिक भारी? हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. स्टार्स स्पोर्ट्सवरील एका कार्यक्रमात पार्थिव पटेलने यावर भाष्य केले आहे.  

चलो दुबई...जुळवाजुळव सुरु

दोन्ही कर्णधारांची तुलना करताना पार्थिव म्हणाला की, एकाने अनेक ट्रॉफी जिंकल्या आहेत. तर दुसऱ्याने मजबूत संघ बांधणी केलीय. 2000 मध्ये ज्यावेळी सौरव गांगुलीकडे संघाचे नेतृत्व देण्यात आले त्यावेळी भारतीय क्रिकेट संघ खूप अडचणीतून जात होता. सौरव गांगुलीने मजबूत संघ बांधणी करुन परदेशात आपण जिंकू शकतो असा विश्वास दिला. यापूर्वी आपण परदेशात जिंकलो नव्हतो असे नाही. पण सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने  हेडिग्ले, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका जिंकली. 2003 मध्ये भारतीय संघ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचेन हे कोणालाही वाटले नव्हते. पण गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली होती, या आठवणीलाही पार्थिवने उजाळा दिला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक चषक उंचावले असले तरी भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार म्हणून दादालाच मत देईन, असेही पार्थिवने यावेळी सांगितले. 

हार्दिक-नताशाच्या फोटोवर चहल-राहुल जोडीची 'लव्हली' रिअ‍ॅक्शन

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने टी-20 विश्वचषक, आयसीसी चॅम्पियनशीप स्पर्धा आणि मर्यादित षटकांची विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. क्रिकेट जगतात आयसीसीच्या या तिन्ही ट्रॉफ्या जिंकून देणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे. धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर भारतीय संघाची मदारही विराट कोहलीच्या खांद्यावर आली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसी चॅम्पियनशीप ट्रॉफी आणि विश्वचषकात प्रबळ दावेदारी असतानाही हार पत्करण्याची नामुष्की ओढवली होती. धोनी हा यशस्वी भारतीय कर्णधाराच्या यादीत आहे. त्याच्यासारख कुणालाही जमणार नाही, अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगते. मात्र गौतम गंभीरनंतर पार्थिव पटेलही दादाच्या मागे गंभीर उभा असल्याचे दिसतोय. 


​ ​

संबंधित बातम्या