लॉर्डसवर स्टुअर्टऐवजी त्याच्या वडिलांना होती हॅट्ट्रिकची संधी?

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस वाया गेल्यानंतर अडीच दिवसात प्रेक्षकांना अनेक मनोरंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. यातच सोनी स्पोर्टसने स्टअर्ट ब्रॉड ऐवजी त्याच्या वडिलांचा उल्लेख केला आणि त्याची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा झाली. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामन्यात तसुभरही मनोरंजनाची कमतरता नव्हती. पावसामुळे सामन्याचा पहिला दिवस वाया गेल्यानंतर अडीच दिवसात प्रेक्षकांना अनेक मनोरंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. यातच सोनी स्पोर्टसने स्टअर्ट ब्रॉड ऐवजी त्याच्या वडिलांचा उल्लेख केला आणि त्याची ट्विटरवर सर्वाधिक चर्चा झाली. 

 

 

भारत चार बाद 61 धावांवर असताना स्टअर्ट ब्रॉड गोलंदाजी करत होता. त्याने आधीच्या दोन्ही चेंडूवर दोन फलंदाज बाद केले होते आणि त्याला हॅटट्रिकची संधी होती. हॅटट्रिक चेंडूच्या आधी सोनी स्पोर्टसने ''Chris Broad on a hat-trick'' असे विधान दर्शवले. ख्रिस ब्रॉड हे स्टुअर्ट ब्रॉडचे वडिल असल्याने सोनीच्या या चुकीमुळे ट्विटरवर त्यांची चांगली चर्चा रंगली होती. 

भारताने हा सामना एक डाव आणि 159 धावांनी गमावला. इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.  

संबंधित बातम्या