Ranji Trophy 2019 : मैदानात घुसला साप अन् थांबविली मॅच

वृत्तसंस्था
Monday, 9 December 2019

विदर्भ आणि नागपूर यांच्यातील रणजी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाला एका विचित्र पाहुण्यामुळे उशीर झाला. विजयवाड्यातील गोकाराजू लैला गंगाराजू आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमयच्या मैदानावर चक्क साप अवतरल्याने विदर्भ आणि आंध्रप्रदेश यांच्यातील रणजी लढतीत व्यत्यय आला. 

विजयवाडा : विदर्भ आणि नागपूर यांच्यातील रणजी सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळाला एका विचित्र पाहुण्यामुळे उशीर झाला. विजयवाड्यातील गोकाराजू लैला गंगाराजू आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन क्रिकेट स्टेडियमयच्या मैदानावर चक्क साप अवतरल्याने विदर्भ आणि आंध्रप्रदेश यांच्यातील रणजी लढतीत व्यत्यय आला. 

INDvsWI : प्रेक्षक 'धोनी धोनी' ओरडताच कोहली भडकला

मैदानावर सापाने प्रवेश घेताच मैदानातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत त्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. बीसीसीआयने याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मैदानावरील साप स्पष्ट दिसत असून मैदानावरील कर्मचारी त्याला हाकलण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. 

मैदानावर साप दिसण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी 2015मध्ये बंगाल आणि विदर्भ यांच्यातील सामन्यातही मैदानावर सापाने प्रवेश केला होता. 


​ ​

संबंधित बातम्या