Happy Birthday Smriti : जगात भारी सांगलीची स्मृती

शैलेश नागवेकर
Thursday, 18 July 2019

क्रिकेटविश्वात केवळ पुरुषांच्या टीम इंडियाचा आणि त्यांचा कर्णधार विराट कोहलीचाच बोलबाला सुरु आहे असे नाही तर महिला क्रिकेटही उत्तंग भरारीसाठी एकेक शिखर पादाक्रांत करत आहेत. तेथे विराट तर येथे स्मृती अवघ्या क्रिकेट विश्वाला आपल्या कवेत घेत आहेत. 2018 चा सर्वक्षेष्ठ खेळाडू, सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू आणि सर्वोत्तम कसोटीपटू  असे आयसीसीचे तीन पुरस्कार मिळवणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. स्मृती मानधनाच्या शोकेसमध्ये अशा ट्रॉफी यायच्या आहेत पण त्या दृष्टीने तिची वाटचाल मात्र सुसाट वेगात सुरु आहे. 

पावलावर पाऊल
1 ऑगस्ट 2017 पासून ते आत्ता पर्यंत ते आत्तापर्यंतंच्या महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सांगलीचा स्मृती मानधना सर्वाधिक धावा करणारी आणि सर्वाधिक सरासरीही असणारी महिला खेळाडू ठरली आहे. असा पराक्रम या अगोदर एकदिवसीय कर्णधार मिताली राजने केलेला आहे तर गोलंदाजीत सर्वाधिक विकेट मिळवण्याचा विक्रम जुलन गोस्वामीने केलेला आहे. मिताली आणि जुलन या वरिष्ठ खेळाडू सध्या खेळत असली तरी स्मृती पुढच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करते. यायाच अर्थ जसा सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर यांच्यानंतर विराट कोहलीचे हाती भारतीय क्रिकेटचे भवितव्य प्रकाशमय झाले आहे तसेच महिला क्रिकेटचेही भवितव्य चमकत आहे.

स्मृती का झाली डावखुरी फलंदाज
बऱ्याच वर्षांपूर्वी क्रिकेट हे केवळ मुंबई, बंगळुर चेन्नई, कोलकता अशा महानरापूरतचे मर्यादित होते. किंबहूना या शहारातून मोठमोठे खेळाडू तयार होत होते. आता पुरुषांच्याच क्रिकेटमध्ये नव्हे तर महिला क्रिकेटचीही पालेमुळे खोलवर पसरली आहेत ज्या सांगलीतून अद्याप एकादा मोठा पुरुष आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार झाला नाही तेथून स्मृतीचा केवळ उदयच झाला नाही तर तो दैदिप्यमानही झाला. स्मृतीचा भाऊ क्रिकेट खेळायचा, भावाकडे पहात तिचीही पावले क्रिकेटकडे वळली भाऊ डावखुरा फलंदाज म्हणून तिही डावखुरी फलंदाज झाली आणि आता क्रिकेट विश्वातील भल्याभल्या गोलंदाजांना डाव्या हाताने पाणी पाजू लागली आहे. 

स्मृती खेळली की भारत जिंकलाच
स्मृती सलामीला खेळते म्हणून तिला डावखुरी सेहवाग म्हणूनही ओळखले जाते कारण प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याची तिची क्षमता अनन्यसाधारण आहे. स्क्वेअर कट असो वा पूल ज्या सफाईदारपणे ती मारते ते नयनरम्य असते. कोठेही आततायीपणा नसतो. म्हणूनच सातत्य असते. विराट कोहली खेळपट्टीवर जास्त काळ उभा राहिला की भारत जिंकला असे समिकरण असते. महिलांममध्येही असेच आहे, स्मृती जेवढी जास्त षटके खेळली की मिताली असो वा हरमनप्रित कौर कोणाची गरज रहात नाही.

तर वर्ल्डकपही जिंकला असता
2018च्या जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. वास्तविक त्या स्पर्धेत स्मृती ज्या ज्या सामन्याच चमकली तो तो सामना भारताने जिंकला होता. अंतिम सामन्यात ती अपयशी ठरली आणि भारताने तो सामना थोड्या फरकाने गमावला होता.

भारतीय क्रिकेटमधल्या या Boss Lady चा आज वाढदिवस! त्यानिमित्त तिच्यावर सोशल मीडियातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. 

​ ​

संबंधित बातम्या