गोलंदाजांवर बरसत स्मृतीचे पहिले ट्वेंटी20 शतक

वृत्तसंस्था
Saturday, 4 August 2018

भारताच्या स्मृती मानधना हिने ट्वेंटी20  मध्ये कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठोकले. इंग्लंडमधील स्थानिक ट्वेंटी20  महिला लीगमध्ये तिने हा पराक्रम केला. वेस्टर्न स्टॉर्मकडून खेळताना तिने लॅंकेशायर थंडरविरुद्ध ही कामगिरी केली. 

मॅंचेस्टर : भारताच्या स्मृती मानधना हिने ट्वेंटी20  मध्ये कारकिर्दीतील पहिलेवहिले शतक ठोकले. इंग्लंडमधील स्थानिक ट्वेंटी20  महिला लीगमध्ये तिने हा पराक्रम केला. वेस्टर्न स्टॉर्मकडून खेळताना तिने लॅंकेशायर थंडरविरुद्ध ही कामगिरी केली. 

 

स्मृतीने 61 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि चार षटकारांची आतषबाजी केली. तिच्या 102 धावांमुळे वेस्टर्नने सात विकेट राखून विजय मिळविला. लॅंकेशायरने 7 बाद 153 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून डावखुऱ्या ऍमी सॅट्टर्थवेटने 85 धावांची खेळी केली. वेस्टर्न स्टॉर्म संघ गतविजेता आहे. स्पर्धेच्या निम्या टप्प्यास त्यांनी गुणतक्‍त्यात आघाडी घेतली. स्मृती फलंदाजांच्या क्रमवारीत आघाडीवर आहे. तिने केट क्रॉसला दोन षटकार ठोकत तोफ डागली. तिला वेस्ट इंडीजच्या स्टीफानी टेलरने चांगली साथ दिली. स्मृतीने अर्धशतक 34 चेंडूंमध्येच पूर्ण केले. स्मृती-स्टिफानी यांनी 105 धावांची भागीदारी रचली. 

संबंधित बातम्या