स्मिथच्या फटकेबाजीने ऑस्ट्रेलियाचा विजय

वृत्तसंस्था
Tuesday, 5 November 2019

- डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच यांच्या अपयशानंतरही स्टिव्ह स्मिथच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून सहज पराभव केला.

- हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) - डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच यांच्या अपयशानंतरही स्टिव्ह स्मिथच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी 20 सामन्यात पाकिस्तानचा सात गडी राखून सहज पराभव केला. पहिला सामना पावसाने वाया गेला होता. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानला 50 षटकांत जेमतेम दीडशेची मजल मारता आली. कर्णधार बाबर आझमच्या (50) अर्धशतकानंतरही अखेरच्या टप्प्यात इफ्तिकार अहमदने दिलेल्या तडाख्यामुळे पाकिस्तानला हे आव्हान गाठता आले. इफ्तिकारने 34 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांच्या सहाय्याने 62 धावा केल्या. 
आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने वेगवान सुरवातीनंतर वॉर्नर आणि फिंच या दोन्ही आक्रमक फलंदाजांना गमावले. पाकिस्तानला यामुळे वर्चस्व राखण्याची संधी होती. मात्र, त्यांच्या गोलंदाजांना स्मिथवर अंकुश ठेवता आला नाही. त्याने मॅकडरमॉटला साथीला घेत ऑस्ट्रेलियाचा विजय निश्‍चित केला. विजयासाठी 45 धावांची गरज असातना मॅकडरमॉट बाद झाला. त्यानंतर स्मिथने एकाहाती ऑस्ट्रेलियाला विजयी केले. स्मिथच्या साथीत नाबाद राहिलेल्या ऍशले टर्नरच्या या 45 धावांच्या भागीदारीत केवळ 8 धावांचा वाटा होता. 
संक्षिप्त धावफलक 
पाकिस्तान 20 षटकांत 6 बाद 150 (बाबर आझम 50 -38 चेंडू, 6 चौकार, इफ्तिकार अहमद 62 -34 चेंडू, 5 चौकार, 3 षटकार, ऍस्टन ऍगर 2-23) पराभूत वि. ऑस्ट्रेलिया 18.3 षटकांत 3 बाद 151 (स्टिव्ह स्मिथ 80 -51 चेंडू, 11 चौकार, 1 षटकार, मॅकडरमॉट 21) 
------------- 


​ ​

संबंधित बातम्या