पुण्यात राष्ट्रीय स्केटींगपटूची दारुच्या बाटलीने गळा चिरुन हत्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 December 2019

कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानातनिलेशची अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन हत्या केली. दारु पिण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

हिंजवडी : मांरुजी येथे कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानात राष्ट्रीय स्केटींगपटूची दारूच्या बाटलीने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निलेश शिवाजी नाईक (24) असे त्याचे नाव असून तो सध्या स्केटींग प्रशिक्षकाचे काम पाहायचा. तो मुळचा कोल्हापूरचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

कोलते पाटील टाऊनशिपच्या मोकळ्या मैदानातनिलेशची अज्ञात मारेकऱ्यांनी गळा चिरुन हत्या केली. दारु पिण्यावरुन झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

Image result for inline hockey
इनलाईन हॉकी

निलेश इनलाईन हॉकी खेळायचा. त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. निगडीला कॅम्प संपवून घरी आल्यानंतर चो मित्रांबरोबर फिरायला गेला आणि तेव्हाच हा प्रकार घडला. राज्यस्तरावर त्याने दोन रौप्य तर एक ब्राँझपदक पटकाविले आहे. 

आज सकाळी ही घटना उघडकीस आहे.  निलेशच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले नसून त्याच्या मृतदेहाशेजारी त्याची दुचाकी व काही बियरच्या बाटल्या सापडल्याचे  साहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत मोहिते यांनी सांगितले. 

निलेश आपल्या आई व मोठ्या भावासह गेल्या पाच सहा वर्षा पासून सुस (ता. मुळशी) येथे राहत होता. तो पुण्यातील गोखलेनगर परिसरात स्केटिंगचा प्रशिक्षक म्हणून काम करत होता.


​ ​

संबंधित बातम्या