सहा जणांना कोरोना, तरीही क्रिकेटचा 'हा' सामना होणार 

शैलेश नागवेकर
Wednesday, 15 July 2020

दक्षिण आफ्रिकेतील बहुचर्चित आणि आगळावेगळा फॉरमॅट असलेल्या 36 षटकांच्या प्रदर्शनीय सामन्याशी संबंधित सहा जणांना कोरोनाची बाधा झाली असली, तरी येत्या शनिवारी हा सामना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेतील बहुचर्चित आणि आगळावेगळा फॉरमॅट असलेल्या 36 षटकांच्या प्रदर्शनीय सामन्याशी संबंधित सहा जणांना कोरोनाची बाधा झाली असली, तरी येत्या शनिवारी हा सामना होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सॉलिडेट्री कप असे या सामन्याचे नाव आहे.

'या' भारतीय क्रिकेटपटूंनी त्यांच्या शेवटच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला

प्रत्येकी आठ खेळाडूंचे तीन संघ सर्व आजी-माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू 36 षटकांचा एकच सामना 18-18 षटकांचे दोन अर्ध अशी आगळीवेगळी रचना करण्यात आलेल्या या प्रदर्शनीय सामन्याकडे क्रिकेटविश्‍वाचे लक्ष लागून राहिले आहे. जून महिन्यात या सामन्याचे नियोजन होते. परंतु कोरोनाची भीती कायम असल्यामुळे 18 जुलैपर्यंत हा सामना लांबणीवर टाकण्यात आला होता. सेंच्युरियन पार्क येथे होणाऱ्या या सामन्याचे स्टार स्पोर्टस्‌ वाहिनीवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे भारतातही या सामन्याची उत्सुकता वाढली आहे.

विराट कोहली असलेल्या वर्ल्ड टी -20 संघाचे नेतृत्व हिटमॅन रोहितकडे      
 
या सामन्यासाठी संबंधित असणाऱ्यापैकी खेळाडू, सपोर्ट स्टाफ, मैदानावरील कर्मचारी अशा 50 जणांच्या कोविड चाचण्या 10 ते 13 जुलैदरम्यान करण्यात आल्या त्यातील 19 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. परंतु ते सहा जण कोण याची माहिती देण्यात आली नाही. या सहा जणांत खेळाडू नसल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले. एबी डिव्हिल्यर्स, कागिसो रबाडा आणि क्विन्टॉन डिकॉक हे तिघे जण तीन संघांचे नेतृत्व करणार आहेत.


​ ​

संबंधित बातम्या