साईना, सिंधूचा 'टॉप्स'मध्ये समावेश 

वृत्तसंस्था
Thursday, 31 January 2019

यांचा झाला समावेश 
-"टॉप्स' योजनेंतर्गत पॅरा ऍथलेटिक्‍स, पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग या खेळातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 
-बॅडमिंटनपटूंमध्ये साईना, सिंधूसह किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, सत्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्‍विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी 
-दिव्यांग खेळाडूंमध्ये वरुण भाटी, शरद कुमार, संदीप चौधरी, सुमी, सुंदर सिंह गुर्जर, रिंकू, अमित सरोहा, वीरेंदर, जयंती बेहेरा 

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी क्रीडा मंत्रालय आणि क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) वतीने साईना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासह आठ बॅडमिंटनपटूंचा "टॉप्स' योजनेत समावेश केला आहे. 

क्रीडा मंत्रालय आणि "साई' यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर एकूण 23 खेळाडूंचा या यादीत समावेश करण्यात आला. यामध्ये दोन पॅरालिंपिक खेळाडूंचा समावेश आहे. यातील काही खेळाडूंचा समावेश हा प्रगतिशील खेळाडू म्हणून 2024 ऑलिंपिकचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला आहे. 

बॅडमिंटनमधील मनू अत्री-बी सुमीत रेड्डी, मेघना जक्काम्पुडी-पूर्विशा राम, सायकलिंगमधील एस्कॉ अल्बेन, रोनाल्डो सिंग, जेम्स सिंग, रोहित सिंग यांना भविष्यातील समावेशासाठी नजरेतील खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. नजर राहणाऱ्या दिव्यांग खेळाडूंमध्ये मरिअप्पन थांगावेलू, दीपा मलिक, देवेंद्र झाझरिया, संदीप सिंग मान, मिथान अमित, रामपाल चहर, धरमेंदर, एकता भ्यान, कर्मज्योती दलाल, राधा आणि रक्षिता यांचा समावेश आहे. दिव्यांग नेमबाज रुबिना फ्रान्सिस, पूजा अगरवाल, सोनिया शर्मा यांच्याही कामगिरीवर नजर राहील. 

यांचा झाला समावेश 
-"टॉप्स' योजनेंतर्गत पॅरा ऍथलेटिक्‍स, पॅरा नेमबाजी, पॅरा जलतरण आणि पॅरा पॉवरलिफ्टिंग या खेळातील खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. 
-बॅडमिंटनपटूंमध्ये साईना, सिंधूसह किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, सत्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, अश्‍विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी 
-दिव्यांग खेळाडूंमध्ये वरुण भाटी, शरद कुमार, संदीप चौधरी, सुमी, सुंदर सिंह गुर्जर, रिंकू, अमित सरोहा, वीरेंदर, जयंती बेहेरा 

संबंधित बातम्या