भारतीय संघात स्थान मिळताच शुभमनने उलगडले हे गुपित

वृत्तसंस्था
Friday, 13 September 2019

भारताचा युवा खेळाडू शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात जागा मिळताच त्याने त्याचे प्रेरणास्थान कोण आहे हे गुपित उलगडले आहे. त्याने त्याचे प्रेरणास्थान मिणून युवराजसिंगचे नाव घेतले आहे. 

नवी दिल्ली : भारताचा युवा खेळाडू शुभमन गिलला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात जागा मिळताच त्याने त्याचे प्रेरणास्थान कोण आहे हे गुपित उलगडले आहे. त्याने त्याचे प्रेरणास्थान मिणून युवराजसिंगचे नाव घेतले आहे. 

शुभमन केवळ 17 वर्षांचा असताना त्याला सिनिअर पंजाब संघात स्थान मिळाले. त्यावेळी संघात हरभजनसिंग आणि युवराजसिंगही होते. त्या दोघांसोबत खेळायला मिळणार म्हणून हुरळून न जाता त्या दोघांकडूम खूप काही शिकण्याचे त्याने ठरविले.  

''त्या दोघांनीही माझी खूप मदत केली. युवी पा माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा प्रवास, त्यांच्या आजाराशी त्याची झुंजआणि त्यांचे खएळासाठी असलेले प्रेम हे पाहून मला खूप प्रेरणा मिळते. भारतीय संघात खेळण्यासाठी तयारी करताना या सर्वांचा मला खूप उपयोग झाला,'' असे मत त्याने व्यक्त केले आहे. 

भारताच्या 19 वर्षांखालील संघात असताना त्याने खूप वेळ 19 वर्षांखालील संघाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविडसोबतही वेळ घालवला आहे. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला,''राहुल सरांनी नेहमीच चांगला माणूस होण्याचा सल्ला दिला. क्रिकेटमुळे मी अजूनही 12वी पूर्ण करु शकलेलो नाही मात्र, लवकरात लवकर ती पूर्ण करायला मला आवडेल.''


​ ​

संबंधित बातम्या