INDvsSA : रोहतही सलामीला अपयशी ठरला तर हा असेल बॅकअप ऑप्शन

वृत्तसंस्था
Saturday, 14 September 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलऐवजी रोहित शर्माला संधी देण्यात आली. सलामीवीर म्हणून त्याच्यावर खूप जबाबदारी असणार यात शंका नाही मात्र, तो अपयशी झाला तरी भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून आणखी एक बॅकअप पर्याय आहे असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे. 

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून लोकेश राहुलऐवजी रोहित शर्माला संधी देण्यात आली. सलामीवीर म्हणून त्याच्यावर खूप जबाबदारी असणार यात शंका नाही मात्र, तो अपयशी झाला तरी भारतीय संघाकडे सलामीवीर म्हणून आणखी एक बॅकअप पर्याय आहे असे निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितले आहे. 

राहुल, लक्ष्मणने केलं तेच तू कर पुन्हा नक्की संघात येशील; निवड समितीच्या अध्यक्षांचा सल्ला

भारतीय संघात नवोदित शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. रोहित अपयशी ठरला तर त्यालाच सलामीवीर म्हणून संधा देण्यास निवड समिती उत्सुक आहे. ''आम्ही शुभमनकडे सलामीवीर तसेच मधल्या फळीतील फळीतील फलंदाज म्हणूनही पाहत आहे. त्याच्याकडे आम्ही दोन्ही जागांचा बॅकअप म्हणून बघत आहोत. त्याला आता जास्तीत जास्त संधी मिळत जातील कारण तो आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी तयार झाला आहे," या शब्दांत त्यांनी शुभमनचे कौतुक केले आहे.

INDvsSA : भारताचा कसोटी संघ जाहीर; केला हा धक्कादायक बदल

राहुलला वगळण्याबाबत बोलताना ते म्हणाले,"राहुलला वगळण्याचा निर्णय घेताला त्याच्याशी बोलणं झालं होतं. तो प्रचंड प्रतिभा असलेला खेळाडू आहे. मात्र, दुर्दैवानं त्याला कसोटी क्रिकेटमध्ये साजेशी कामगिरी करता आलेली नाही. शिखर धवन आणि मुरली विजय यांच्यानंतर अनुभवी फलंदाज म्हणून त्याला अधिक संधी देण्यात आली होती. मात्र, त्याला चांगली कामगिरी करता आली नाही.''
 

संबंधित बातम्या