आता कसाही खेळ धवन, तुला आहे 'या' युवा खेळाडूचा तगडा पर्याय 

शैलेश नागवेकर
Thursday, 7 November 2019

पण पृथ्वी कर्णधार असलेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील त्याचा सहकारी शुभमन गिल मात्र सर्व आघाड्यांवर प्रगती करत आहे. मुळात त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे त्याचा त्याने फायदा घेतलेला आहे आणि सोबत विराट कोहलीसह संघ व्यवस्थानाचाही विश्‍वास मिळवलेला आहे.

मुंबई : वीरेंद्र सेहवागची जागा शिखर धवनने घेतली तेव्हा कसोटी पदार्पणात मोहातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध तडाखेबंद दीडशतकी खेळी केल्यावर तो भारतीय संघातील प्रमुख घटक ठरलेला आहे. कसोटी असो, एकदिवसीय किंवा ट्‌वेन्टी-20 तिन्ही प्रकारात तो प्रथम क्रमांकाचा सलामीवीर राहिलेला आहे.डावखुरेपणा ही त्याच्यासाठी जमेची बाजू राहिलेली आहे. पण गेल्या काही वर्षातली त्याची कामगिरी पाहिली तर अनेक सामने अपयशी ठरल्यानंतर धवन एखादी खेळी करतो आणि संघातले स्थान कायम ठेवतो. 

कधीकाळी विराटच्या टीममध्ये खेळला, आता फिक्सिंगमुळे जेलमध्ये गेला

अर्थात कसोटी क्रिकेटच्या प्रकारात हे त्याला शक्‍य झालेले नाही. पृथ्वी शॉच्या रुपाने कसोटीत धवनसाठी पर्याय मिळाला पण पृथ्वीही वेगळ्या कारणामुळे संघाबाहेर गेला आणि मयांक अगरवालला संधी मिळाली त्याने आपली जागा पक्कीही केली. पृथ्वी शॉ जर संघात राहिला असला तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो धवनसाठी मुख्य पर्याय राहिला असता. पण म्हणतात ना. विपरित बुद्धी झाली आणि शॉ आता सीमारेषेच्याही बाहेर गेलेला आहे. 

Image result for shubhman gill

पण पृथ्वी कर्णधार असलेल्या 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील त्याचा सहकारी शुभमन गिल मात्र सर्व आघाड्यांवर प्रगती करत आहे. मुळात त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळालेली आहे त्याचा त्याने फायदा घेतलेला आहे आणि सोबत विराट कोहलीसह संघ व्यवस्थानाचाही विश्‍वास मिळवलेला आहे. निवड समितीनेही त्या दृष्टीने विचार सुरु केलेला आहे.

INDvsBAN : धावा कर नाहीतर.. गावसकरांची 'या' प्रमुख खेळाडूलाच धमकी

पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेच्या तयारीपूर्वी टीम इंडिया साधारतः 20 ट्‌वेन्टी-20 सामने खेळणार आहे. त्यात गिलला निश्‍चितच संधी दिली जाईल. एकदा का गिल चमकला की धवनचे काही खरे नसेल. केएल. राहुल पर्यायी सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळवून आहे, परंतु गिलला तयार करण्यासाठी संघ व्यवस्थापनही तयार आहे.


​ ​

संबंधित बातम्या