सचिन आणि 'ती' होते एकत्र; अभिनेत्रीचा खळबळजनक दावा

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्री श्री रेड्डीने आता थेट  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली : चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचविरोधात आवाज उठविण्यासाठी रस्त्यावर टॉपलेस होणाऱ्या अभिनेत्री श्री रेड्डीने आता थेट  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आरोप केले आहेत. 

श्री रेड्डीने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरवर आरोप करत त्याचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्री चार्मी कौर हिच्यासोबत जोडलं आहे.

 

श्री रेड्डीने आपल्या फेसबुक अकाउंटवरुन सचिन तेंडुलकरला थेट लक्ष्य करत, एक पोस्ट लिहिली. ''सचिन तेंडुलकर हैदराबादमध्ये आला असताना एका ‘चार्मिंग गर्ल’ने त्याच्यासोबत रोमान्स केला. महान व्यक्ती चांगला खेळ खेळू शकतात, माझा अर्थ चांगला रोमान्स करू शकतात असा आहे. यावेळी चामुंडेश्वर स्वामी यांनी मध्यस्ती केली होती.'' 
या पोस्टमधील चार्मिंग गर्ल ही तेलुगू अभिनेत्री चार्मी कौर असल्याचं मानलं जात आहे. तिच्या या पोस्टवर आता सचिन तेंडुलकर किंवा स्वत: चार्मी कौर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

श्री रेड्डीने यापूर्वीही बऱ्याच लोकांवर आरोप केले आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण, नानी,  प्रसिद्ध दक्षिणात्य निर्माते सुरेश बाबूचा मुलगा अभिराम दग्गुबती अशा अनेकांवर तिने कास्टिंग काऊचचे आरोप केले होते. 

संबंधित बातम्या