बीसीसीआयने तयार केलेल्या मार्गावर श्रीलंकेचा आयत्या बीळावर नागोबा 

शैलेश नागवेकर
Tuesday, 28 July 2020

भारतीय क्रिकेट मंडळाने ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यासाठी दबाव निर्माण करत आयपीएलसाठी मार्ग मोकळा केला. मात्र या वाहत्या गंगेत श्रीलंका क्रिकेट मंडळाने हात धूवून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कोलंबो : भारतीय क्रिकेट मंडळाने ट्‌वेन्टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यासाठी दबाव निर्माण करत आयपीएलसाठी मार्ग मोकळा केला. मात्र या वाहत्या गंगेत श्रीलंका क्रिकेट मंडळाने हात धूवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. भवितव्य अधांतरी असलेली श्रीलंका क्रिकेट लीग 28 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्याचा निर्णय श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने घेतला आहे. 

`वदे भारत'द्वारे परदेशी कुस्ती कोच भारतात

श्रीलंका क्रिकेट मंडळाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत या लीगला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. पाच संघ आणि 23 सामने असे या लीगचे स्वरुप असणार आहे. बहुचर्चित आयपीएल 19 सप्टेंबरपासून अमिरातीत सुरू होत आहे. आयपीएलचे वेळापपत्रक रविवारी होणाऱ्या प्रशासकीय समितीच्या बैठकीत निश्‍चित होईल. 

70 परदेशी खेळाडू 
श्रीलंकेतील ही लीग चार आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना असे पाच संघ सहभागी होणार आहेत. यात 70 आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि 10 अव्वल प्रशिक्षकांनी आपला सहभाग निश्‍चित केला असल्याचे श्रीलंका क्रिकेट मंडळाने जाहीर केले आहे. प्रत्येक संघ सहा परदेशी खेळाडू निवडू शकतो पण अंतिम संघात चारच परदेशी खेळाडू खेळवता येईल. श्रीलंका क्रिकेट लीग 2018 पासून सुरू झालेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार यंदाची लीग 8 ते 22 ऑगस्ट दरम्यान होणार होती.


​ ​

संबंधित बातम्या