विराट-श्रेयशचा शेजारधर्म.... 'होम मेड' डोसा फॉर कॅप्टन!

टीम ई-सकाळ
Wednesday, 8 July 2020

भारतीय संघातील युवा क्रिकेटर श्रेयस अय्यरही आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतच राहतो. विराट आणि श्रेयस यांची घरे एकमेकांच्या घरापासून काही अंतरावरच आहेत.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली लॉकडाउनच्या काळात पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबईतील घरामध्येच आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे क्रिकेटला मोठा ब्रेक लागला आहे. त्यामुळे सर्वच क्रिकेटर्सप्रमाणे विराट कोहलीही मार्चपासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. भारतीय संघातील युवा क्रिकेटर श्रेयस अय्यरही आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईतच राहतो. विराट आणि श्रेयस यांची घरे एकमेकांच्या घरापासून काही अंतरावरच आहेत. अय्यर चक्क आपल्या आईच्या हातचा डोसा घेऊन आपल्या कर्णधाराच्या घरी पोहचल्याचे पाहायला मिळाले. विराट कोहलीने ट्विटरवरुन फोटो शेअर करत स्वत:च ही माहिती दिली आहे.  

 

धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो

विराटने ट्विटरव केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय की, एक चांगला शेजारी, जो आमच्या घरापासून जवळपास 500 मीटर अंतरावरच राहतो. तो आमच्यासाठी घरात बनवलेला डोसा घेऊन आलाय. त्यामुळे आमच्या चेहऱ्यावर स्मित हास्य दिसत आहे. या फोटोमध्ये विराटसह श्रेयसने मास्क घातल्याचे दिसते. एवढेच नाही तर दोघांनीही आपल्या हातात ग्लोव्जही घातले आहेत. 'हा फोटो काढण्याचा नवा नियम आहे. सोशल डिस्टन्सिंगसोबत' या कॅप्शनसह या जोडीने कोरोनाजन्य परिस्थितीत सरकार आणि प्रशासनाला सहकार्य करत आपल्याला नियमांचे पालन करायचे आहे, असा संदेशच त्यांनी दिला आहे.

- क्रिडा जगतातील  बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

इंग्लंडच्या मैदानातून इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या माध्यमातून आजपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात होत आहे. मात्र भारतीय क्रिकेट मंडळाने राष्ट्रीय टीमच्या शिबीरासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. काही खेळाडूंनी आपपल्या पातळीवर सराव सुरु केला असला तरी संघ एकत्र सरावासाठी कधी उतरणार? हे अद्यापही निश्चित नाही.   


​ ​

संबंधित बातम्या