Schoolympics 2019 : एकेरी टेनिस स्पर्धेत श्रेया देशपांडेने पटकाविले सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 November 2019

छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) श्रेया देशपांडेने गॅलॅक्‍सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ज्ञानेश्‍वरी चौगुलेवर ८-२ गुणफरकाने पराभव केला.

कोल्हापूर : चौदा वर्षांखालील मुलींच्या एकेरी टेनिस स्पर्धेत श्रेया देशपांडेने सुवर्ण, ज्ञानेश्‍वरी चौगुलेने रौप्य, तर मैत्रेयी इंगळे यांनीकास्यपदक पटकाविले. दुहेरीत मैत्रेयी इंगवले व समीक्षा पाटीलने सुवर्ण, जान्हवी निवळे व निशिगंधा पाटीलने रौप्य, तर भाविका राजोपाध्ये व श्रुती शंकरगौडाने कास्यपदक मिळविले. मॅप्रो स्कूलिंपिक्‍स शालेय क्रीडा स्पर्धा येथे सुरू आहे. विभागीय क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर स्पर्धा झाली.

छत्रपती शाहू विद्यालयाच्या (सीबीएसई) श्रेया देशपांडेने गॅलॅक्‍सी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ज्ञानेश्‍वरी चौगुलेवर ८-२, तर डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या मैत्रेयी इंगळेने होलिक्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या वंशिका पाटीलचा ८-१ गुणफरकाने पराभव केला.

दुहेरीत डॉ. डी. वाय. पाटील ॲकॅडमीज शांतिनिकेतनच्या मैत्रेयी इंगळे व समीक्षा पाटीलने हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या जान्हवी निवळे व निशिगंध पाटीलवर ८-०, तर संजय घोडावत इंटरनॅशनल केंब्रिज स्कूलच्या भाविका राजोपाध्ये व श्रुती शंकरगौडाने हौसाबाई मगदूम पब्लिक स्कूलच्या भाग्यश्री हुक्केरी व आकांक्षा लांडेवर ८-२ गुणफरकाने मात केली.


​ ​

संबंधित बातम्या