धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव... वाचा कोणी कोणी दिल्या शुभेच्छा

टीम ई-सकाळ
Tuesday, 7 July 2020

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मंगळावारी वाढदिवस साजरा झाला. 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनी भारताकडून उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनीला पुन्हा अद्याप संघातून खेळायची संधी मिळालेली नाही. धोनी गेले अनेक दिवस क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजिबात घट झालेली नाही, याचा प्रत्यय आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आला. सोशल मीडियावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव केला. 

पुणे : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मंगळावारी वाढदिवस साजरा झाला. 2019 च्या विश्वकरंडक स्पर्धेत धोनी भारताकडून उपांत्य सामना खेळला. त्या पराभवानंतर धोनीला पुन्हा अद्याप संघातून खेळायची संधी मिळालेली नाही. धोनी गेले अनेक दिवस क्रिकेटपासून दूर असला, तरी त्याच्या चाहत्यांच्या संख्येत अजिबात घट झालेली नाही, याचा प्रत्यय आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आला. सोशल मीडियावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव केला. 

वाढदिवसाच्या शुभेच्छा! माही भाई, सुखी आणि आरोग्यदायी रहा. 
- विराट कोहली ( भारतीय संघाचा कर्णधार) 

जन्मदिवसाच्या शुभेच्छा यंगस्टर! महान खेळाडू महेंद्रसिंग धोनी 
- रवी शास्त्री (भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक) 

धोनी भाई, वाढदिवसाच्या शुभेच्छा, तू खूप चांगला आहेस. 
- अजिंक्‍य रहाणे (कसोटी उपकर्णधार) 

एका महान खेळाडूला वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्यासाठी प्रेरणा आणि इतर बरेच. माही भाई सुखी राहा, 
- युझवेंद्र चहल 

आजचा दिवस आनंदाने जावो, देव तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवो. वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई! 
- कुलदीप यादव 

तू मला चांगल्या आणि वाईट काळात कसे जगायचे ते शिकवले. माझ्या बिट्टू (धोनी)ला चिट्टूकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
- हार्दिक पंड्या 

महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! एक उत्तम नेतृत्व करणारा, अंतिम चेंडूपर्यंत लढणारा, खऱ्याच्या बाजूने उभा राहणारा... संघाला आणि मला मार्गदर्शन करणारा, त्याच्यासोबत खेळता आले, ते क्षण माझ्यासाठी महान आहेत. 
- श्रीशांत 

तुझा संयम लोकांसाठी प्रेरणादायी. धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
- व्हीव्हीएस लक्ष्मण 

एका पिढीमध्ये असा एक खेळाडू येतो आणि तो राष्ट्राला जोडतो. कुछ बहुत अपना सा लगता है ! जगाचा माणूस महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
- वीरेंद्र सेहवाग 

माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी, माझा आवडता माणूस, जो कायम शांत डोक्‍याने आणि मनाने खेळतो... धोनीला भाईला वाढदिवसाच्या शुभेच्छा! 
- सुरेश रैना 

भारताचा एक महान कर्णधार आणि माझे प्रेरणास्थान एम एस धोनी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
- दीप्ती शर्मा ( भारताची अष्टपैलू) 

"अनहोनी को होनी कर दे, होनी को अनहोनी एक जगह जब जमा हो तिनों" महेंद्रसिंग धोनी, देव तुला आशीर्वाद देवो आणि पुढे एक अद्भुत वर्ष मिळो. 
- विनोद कांबळी (माजी फलंदाज) 

ब्रावोकडून "चॉपर 7' चे गाणे 
चेन्नई सुपरकिंग्जने ब्राव्होचे गाणे शेअर केले 
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) च्या नेतृत्वात खेळलेल्या ब्राव्होने धोनीला "चॉपर -7' गाणे गाऊन वाढदिवसाची भेट दिली. या गाण्यात ब्राव्होने धोनीचा संपूर्ण क्रिकेट प्रवास सांगितला आहे. या गाण्यात धोनीने जिंकलेल्या तिन्ही आयआयसी स्पर्धांचा उल्लेख आहे. तसेच धोनीची छाप असलेल्या हेलिकॉप्टर शॉटचेही वर्णन आहे. 

आयुष्याचे आणखी एक वर्ष वाढले आहे. यासह तू थोडा अधिक गोड आणि स्मार्ट झाला आहेस. तू असा एक व्यक्ती आहेस जो शुभेच्छा आणि भेटवस्तूंनी प्रभावित होत नाही. चल, आपल्या आयुष्याचे आणखी एक वर्ष साजरे करूया. 
- साक्षी (धोनीची पत्नी) 

भारतीय संघाला महेंद्रसिंग धोनी मिळाला. कारण तो खूपच अप्रतिम खेळाडू आहे. केवळ फिनिशरच नाही, तर तो जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. महेंद्रसिंग धोनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 
- सौरव गांगुली (बीसीसीआय अध्यक्ष)


​ ​

संबंधित बातम्या