शोएबने सानियासाठी शेअर केला स्पेशल व्हिडिओ

वृत्तसंस्था
Saturday, 15 September 2018

दुबई : बाळ जन्माची वाट पाहत असलेले सानिया मिर्झा व शोएब मलिक हे दांपत्य सध्या वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी पत्नीपासून दूर असलेल्या शोएबने सानियासाठी स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे.

दुबई : बाळ जन्माची वाट पाहत असलेले सानिया मिर्झा व शोएब मलिक हे दांपत्य सध्या वेगवेगळ्या ठिकाणी असले तरी पत्नीपासून दूर असलेल्या शोएबने सानियासाठी स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे.

भारताची अव्वल टेनिसपटू साईना मिर्झा सध्या गरोदर असून तिचा पती, पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक सध्या आशिया करंडक स्पर्धेसाठी दुबईत आहे. त्याच्या आठवणीत तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली होती. त्याला प्रतिक्रीया देत शोएबनेसुद्धा इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

सानियाने म्हटले होते, की माझ्याकडे टाईम मशीन हवी त्यामुळे मला त्याची एक झलक घेता येईल. यावर मलिकने सगेच व्हिडिओच्या माध्यमातून पत्नीसाठी सरप्राईज गिफ्ट पाठविले. या व्हिडिओत त्याने म्हटले आहे, की पत्नी जे बोलत आहे ते योग्य आहे. तुझ्याकडून मला मिळणाऱ्या नव्या सरप्राईजची वाट पाहत आहे.

संबंधित बातम्या