शोएब म्हणतो, बांगलादेशच्या क्रिकेटपटूने काढलेली सानियाची छेड

वृत्तसंस्था
Sunday, 2 September 2018

भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिची बांगलादेशचा क्रिकेटपटू शब्बीर रेहमान याने छेड काढली होती, याचा खुलासा खुद्द शोएबनेच केला आहे.

नवी दिल्ली : भारताची टेनिसपटू आणि पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झा हिची बांगलादेशचा क्रिकेटपटू शब्बीर रेहमान याने छेड काढली होती, याचा खुलासा खुद्द शोएबनेच केला आहे.

शोएब मलिकने केलेल्या दाव्यानुसार, स्थानिक स्पर्धेसाठी ढाक्यात खेळण्यासाठी गेल्यानंतर शब्बीर रेहमान याने सानियाशी छेडछाड केली होती. याबाबतची अधिकृत तक्रार मी क्रिकेट कमेटी ऑफ ढाका मेट्रोपोलिस यांच्याकडे केली होती. मला प्रोत्साहन देण्यासाठी सानिया मैदानावर आली असताना शब्बीरने हे कृत्य केले होते.

बांगलादेशचा हा क्रिकेटपटू शब्बीर सतत वादात असतो. त्याच्या मैदानावरील कृत्यामुळे अनेकवेळा त्याला शिक्षा झालेली आहे. नुकतेच बांगलादेश क्रिकेट मंडळाने शब्बीरला सोशल मीडियावर चाहत्याला धमकाल्याप्रकरणी आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी सहा महिन्यांच्या बंदीची शिक्षा घातली आहे. त्याला आशिया करंडकासाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. त्याने एकदा मैदानात क्रिकेटप्रेमीशी वादही घातला होता. आता त्याच्या बाबतीत शोएब मलिकने नवा खुलासा केला आहे.


​ ​

संबंधित बातम्या