'पंतप्रधान मोदी धोनीला टी-२० वर्ल्डकप खेळण्याची विनंती करू शकतात'

टीम ई-सकाळ
Wednesday, 19 August 2020

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनादिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शनिवारी स्वातंत्र्यदिनादिवशीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयाचा क्रिकेट जगतासह सर्वांनाच मोठा धक्का बसला. मात्र त्यानंतर क्रिकेट मधील अनेक आजी-माजी खेळाडूंनी धोनीच्या निर्णयाचा आदर करत यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेक जणांनी धोनीला क्रिकेट मधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर शुभेच्छा दिल्या आहेत. तर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासह अन्य काही जणांनी धोनीच्या निरोपासाठी विशेष सामना आयोजित करण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) केली आहे. आणि या सर्वांच्या नंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने याहून पुढे जाऊन आपले मत व्यक्त करताना, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महेंद्रसिंग धोनीला आगामी टी-20 विश्वचषकासाठी फोन करून विनंती करू शकतात, असे म्हटले आहे. 

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड 

भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने 15 ऑगस्टच्या संध्येला 7 वाजून 29 मिनिटांनी सोशल मीडियाच्या इन्स्टाग्रामवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून संन्यास घेतल्याचे जाहीर केले. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीवर बोलताना पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने, धोनीने पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या टी-20 विश्वचषकानंतर निवृत्तीचा निर्णय घ्यायला हवा होता, असे म्हटले आहे. तसेच धोनीबद्दल बोलताना, रांची सारख्या एका लहान शहरातून आलेला खेळाडू व नंतर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार होईल, असा कोणीही विचारसुद्धा केला नसल्याचे शोएब अख्तरने या मुलाखतीमध्ये सांगितले. तसेच भारतात सर्व खेळाडूंना नेहमीच सन्मान दिला जात असल्यामुळे, धोनीच्या निवृत्तीनंतर देखील त्याचे क्रिकेटमध्ये  कायम महत्व राहणार असल्याचे शोएब अख्तरने यावेळेस म्हटले आहे. 

...जेंव्हा विराट कोहलीने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ; वाचा सविस्तर   

तसेच, पुढील वर्षी भारतातच होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये एम एस धोनीला खेळण्याची विनंती भारताचे पंतप्रधान करू शकतात, असे शोएब अख्तर मुलाखती दरम्यान म्हणाला. आणि देशातच ही महत्वाची स्पर्धा होत असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धोनीला खेळण्याची विनंती करण्याची मागणी शोएब अख्तरने केली आहे. व देशाच्या पंतप्रधानांच्या या विनंतीला कोणताही खेळाडू नाकारू शकत नसल्याचे मत शोएब अख्तरने व्यक्त केले. याव्यतिरिक्त, 1987 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान झिया उल-हक यांनी अशाच प्रकारे इम्रान खान यांना अजून काही काळ क्रिकेट खेळत राहण्यास म्हटल्याचे शोएब अख्तरने यावेळी सांगितले. त्यामुळे भारताच्या पंतप्रधानांनी धोनीला अशी विनंती केल्यास तो नक्कीच आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेत उतरेल, असा विश्वास शोएब अख्तरने व्यक्त केला.                                  

शतकांनी हुलकावणी दिलेला भारताचा सलामीवीर काळाच्या पडद्याआड               

दरम्यान, भारतीय क्रिकेटच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्‍वात इतिहास घडवणाऱ्या धोनीच्या निवृत्तीने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यापूर्वी धोनीने 2007 पासून ते 2016 पर्यंत भारतीय संघाच्या नेतृत्व पदाची धुरा सांभाळली होती. या कालावधीत भारताने 2007 मध्ये टी-20 वर्ल्ड कप, 2011 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.


​ ​

संबंधित बातम्या